Advertisement

बॉलिवूड कलाकारांनी मानले पोलिसांचे आभार, मुंबई पोलिसांची फिल्मी उत्तरं

ज्या-ज्या बॉलिवूड कलाकारांनी रिप्लाय दिला त्या सर्वांना मुंबई पोलिसांनी एकदम हटके अंदाजात उत्तर दिलं आहे.

बॉलिवूड कलाकारांनी मानले पोलिसांचे आभार, मुंबई पोलिसांची फिल्मी उत्तरं
SHARES

मुंबई पोलीस आपल्या कामात नेहमीच तत्पर असतात. त्याचप्रमाणे ते सोशल मीडियावर देखील तेवढेच सक्रिय आहेत. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड केला होता. या व्हिडीओवर ज्या-ज्या बॉलिवूड कलाकारांनी रिप्लाय दिला त्या सर्वांना मुंबई पोलिसांनी एकदम हटके अंदाजात उत्तर दिलं आहे.

जे लॉकडाऊनला कंटाळले आहेत त्यांच्यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एक व्हिडीओ शेअर केला आहे. मुंबई पोलिसांनी या व्हिडीओला असं कॅप्शन दिलं आहे की, 'असं वाटतंय की लॉकडाऊन संपतच नाही आहे. कल्पना करा आम्ही घरी असतो तर काय काय केलं असतं.'  यामध्ये कर्तव्य बजावत असणाऱ्या काही पोलिसांच्या प्रतिक्रिया दाखवण्यात आल्या आहेत. यातून त्यांना किती मनापासून घरी राहायचं आहे, त्यांना कुटुंबाची किती आठवण येत आहे हे त्यांनी सांगितलं आहे.

 

सुनिल शेट्टीनं मुंबई पोलिसांना हा व्हिडीओ पाहून 'हिरो' म्हटलं आहे. मुंबई पोलिसांनी देखील यावर भन्नाट उत्तर दिलं आहे.

अजय देवगणनं सुद्धा हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर रिप्लाय देताना मुंबई पोलिसांनी 'सिंघम' आणि 'Once upon a time in Mumbai या चित्रपटांचा संदर्भ वापरला आहे. 'सर्व गोष्टी पूर्ववत करण्यासाठी 'खाकी'नं जे केलं पाहिजे ते आम्ही करत आहोत', अशी प्रतिक्रिया मुंबई पोलिसांनी दिली आहे.

तर हा व्हिडीओ शेअर करताना अभिषेक बच्चन म्हणतोय की 'आम्ही मुंबई पोलिसांचे आणि त्यांच्या कामाचे कायम ऋणी राहू' यावर रिप्लाय देताना मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना 'दस बहाने' न करण्याचा सल्ला दिला आहे


अर्जुन कपूर आणि आयुषमान खुरानानं देखील पोलिसांचे आभार मानले आहेत. 







संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा