कोब्रा पोस्टच्या दाव्यावर सनी लिओनी, सोनू सुदचं स्पष्टीकरण

कोब्रा पोस्टनं जाहीर केलेल्या यादीत ३६ कलाकारांची नावं असून त्यांच्यासोबत केलेलं स्टिंग ऑपरेशनचे व्हिडिओ देखील शेअर करण्यात आले आहेत. कोब्रा पोस्टनं केलेल्या दाव्यानंतर अभिनेत्री सनी लिओनी आणि अभिनेता सोनू सुद यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

SHARE

लोकसभेच्या निवडणुका मार्च महिन्याच्या पहिल्या अाठवड्यात जाहीर होतील. या निवडणुकीच्या प्रचारासाठी जवळपास ३६ कलाकारांनी पैसे घेऊन प्रचार केला, असा दावा कोब्रा पोस्टनं केला आहे. वेबसाईटनं याची एक यादी जाहीर केली आहे. या यादीत ३६ कलाकारांची नावं असून त्यांच्यासोबत केलेलं स्टिंग ऑपरेशनचे व्हिडिओ देखील शेअर करण्यात आले आहेत. कोब्रा पोस्टनं केलेल्या दाव्यानंतर अभिनेत्री सनी लिओनी आणि अभिनेता सोनू सुद यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.


सनी लिओनीनं फेटाळले आरोप

कोब्रा पोस्टनं जवळपास ३६ कलाकारांवर स्टिंग ऑप्रेशन केलं. यामध्ये बड्या कलाकारांच्या नावाचा समावेश आहे. आत्तापर्यंत फक्त सोनू सुद आणि सनी लिओनी या दोघांनीच याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. सनी लिओनीनं कोब्रा पोस्टनं केलेले दावे फेटाळून लावले आहेत.

'लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करत नाही. जर प्रचार करण्याचा निर्णय घेतला तर मी ते जाहीरपणे सांगेन. ज्या गोष्टींमध्ये सत्यता आहे असा गोष्टी मी करने,’ असं सनी लिओनीनं ट्विटरवरील पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे. 


चर्चा चुकीच्या पद्धतीन मांडली : सोनू

तर सोनू सुदनं देखील आपली बाजू ट्वीटरच्या माध्यमातून मांडली आहे. 'आमच्यात झालेली चर्चा चुकीच्या पद्धतीनं मांडण्यात आली आहे. चर्चेतील काही ठराविक भागच दाखवण्यात आला आहे. अनेकदा कलाकार मोठ्या ब्रॅण्ड आणि राजकीय पक्षांच्या जाहिराती करण्यासाठी तयार होतात. पण इथं चुकीच्या पद्धतीनं कंटेंट सादर करण्यात आलं आहे. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचाच मी प्रचार करेन, चुकीच्या गोष्टींना माझा पाठिंबा नसेल,' असं मत सोनूनं व्यक्त केलं. 


कोणत्या कलाकारांचा समावेश?

कोब्रा पोस्टनं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये शक्ती कपूर, जॅकी श्रॉफ, विवेक ओबेरॉय, सोनू सुद, अमिषा पटेल, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे,  सुरेंद्र पाल,  दीपशिखा नागपाल, अखिलेंद्र मिश्रा,  राहुल भट्ट,  पुनीत इस्सर, टिस्का चोप्रा,  राहुल भट्ट,  राखी सावंत, सलीम जैदी, हितेन तेजवानी,  गौरी प्रधान, कैलाश खेर, सनी लिओनी, कोयना मित्रा, इवलिन शर्मा, पूनम पांडे, अमन वर्मा या कलाकारांचा समावेश आहे. हे सर्व कलाकार पैसे घेऊन राजकीय प्रचार करण्यास तयार असल्याचा दावा कोब्रा पोस्टनं केला होता.  


'या' कलाकारांनी दाखवली प्रामाणिकता

कोब्रा पोस्टनं ४० कलाकारांवर स्टिंग ऑप्रेशन केलं होतं. ४० पैकी३६ कलाकार पैशासाठी निवडणूक प्रचार करम्यास तयार झाल्याचा दावा कोब्रा पोस्टनं केला. पण अन्य ४ कलाकारांनी पैसे देऊन प्रचार करण्यास नकार दिला. यामध्ये अर्शद वारसी, विद्या बालन, रजा मुराद, सौम्या टंडन या कलाकारांचा समावेश आहे.  


संबंधित विषय
ताज्या बातम्या