Advertisement

आर्यन खानच्या जामीनावर २० ऑक्टोबरला होणार निर्णय

आर्यन खानच्या जामीन अर्जावर २० ऑक्टोबरला निर्णय घेण्यात येणार आहे.

आर्यन खानच्या जामीनावर २० ऑक्टोबरला होणार निर्णय
SHARES

बॉलिवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर २० ऑक्टोबरला निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे आर्यन खानला आणखी एक आठवडा तुरुंगातच राहावं लागणार आहे. 

गुरुवारी झालेल्या सुनावणीत आर्यन खानचे वकिल अनिल देसाईनं म्हटलं की, NCB एवढ्या छोट्या प्रकरणातही मोठ्या सेलिब्रिटींना फसवून एक उदाहरण ठेवत आहे. छोट्या प्रकरणातही त्यांना मोठी शिक्षा सुनवायची आहे, असा आरोपही देसाई यांनी केला आहे.   

तर बुधवारी झालेल्या सुनावणीत, एनसीबीनं न्यायालयात आपली बाजू मांडली. एनसीबीनं न्यायालयाला सांगितलं की, जरी आर्यन खानकडून बंदी घातलेला पदार्थ जप्त केला नसला तरी तो एका मोठ्या षडयंत्राचा भाग आहे. एनसीबीनं न्यायालयाला असंही सांगितलं की, आर्यन खानवर प्रतिबंधित पदार्थ वापरल्याचा आरोप आहे. तो बंदी असलेला पदार्थ अरबाज मर्चंटकडून जप्त करण्यात आला आहे.

एनसीबीनं न्यायालयात म्हटलं आहे की, एका आरोपीचे आरोप आणि इतरांवरील आरोप वेगळे केले जाऊ शकत नाहीत. तपास यंत्रणेनं सांगितलं की, या प्रकरणाचा तपास अत्यंत महत्त्वाचा आहे. एनसीबीनं म्हटलं आहे की, या प्रकरणात एजन्सी परदेशातून पैशांच्या व्यवहाराबाबत तपास करत आहे, जे अत्यंत महत्वाचे आहे.

एनसीबीनं (NCB) २ ऑक्टोबरला रात्री एका क्रुझवर सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर छापा मारला. याप्रकरणी ८ लोकांना अटक करण्यात आली होती. यात शाहरुखचा मुलगा आर्यन खान देखील होता.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा