Advertisement

दीपिका पदुकोण आशियातील सर्वात प्रभावशाली महिला

बॉलिवूडची मस्तानी अर्थात दीपिका पदुकोणला आशियातील सर्वात प्रभावशाली महिला होण्याचा सन्मान मिळाला आहे.

दीपिका पदुकोण आशियातील सर्वात प्रभावशाली महिला
SHARES

बॉलिवूडची मस्तानी अर्थात दीपिका पदुकोणला आशियातील सर्वात प्रभावशाली महिला होण्याचा सन्मान मिळाला आहे. चित्रपट आणि टेलिव्हिजनवरील सर्वात प्रभावशाली महिला म्हणून तिला गौरवण्यात आलं आहे. हा सन्मान मिळवणारी दीपिका ही पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे.

दीपिकाचा चाहता वर्ग फार मोठा आहे. यामुळे सर्वाधिक चाहतावर्ग असलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत ती टॉप १०० मध्ये येते. सध्या दीपिकाचे इन्स्टाग्रमावर जवळपास ५९.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. तर गुगलवरही ती नेहमीच ट्रेडींगवर पाहायला मिळते. दीपिकाच्या सर्वाधिक चाहत्यावर्गामुळे तिला आशियातील सर्वात प्रभावशाली महिला म्हणून निवडण्यात आलं आहे.

दीपिकानं सिनेसृष्टीत पाऊल ठेवून तिला १३ वर्ष झाली आहेत. यादरम्यान तिनं बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्ये तिची वेगळी छाप पाडली आहे. दीपिका ही अनेक ब्रँडच्या जाहिरातीत काम करते.

दरम्यान, दीपिका तनिष्क, ओपो,नेस्ले फ्रूट व्हिला, लॉरिअल, रिलायन्स जियो, अ‍ॅक्सिस बँक, गुवार लाइटिंग नेसकॅफे, केलॉग्स, विस्तारा एअरलाईन्स,लक्स,जिलेट, ब्रिटानिया, गोआईबीबो या सारख्या बड्या ब्रॅण्डच्या जाहिरातींची ब्रँड अॅम्बेसेडर आहे.

दरम्यान, दीपिका रणवीरसोबत ’83’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्यानंतर दीपिका ‘पठाण’ आणि ‘फाइटर’, ‘द इंटर्न’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. दुसरीकडे, रणवीर सिंह ‘सर्कस’, ‘तख्त’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.हेही वाचा

संगीतप्रेमींसाठी भक्तीमय नजराणा 'बाप्पा मोरया'

गणेशोत्सवानिमित्त पिकल म्युझिकचं 'गणपती अंगणात नाचतो...' गाणं रिलीज

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा