Advertisement

लोकप्रिय महिला स्टार्सच्या यादीत दीपिकानं पटकावलं पहिलं स्थान

अभिनेत्री दीपिका पादुकोणनं पुन्हा एकदा २०२०च्या सर्वाधिक लोकप्रिय महिला स्टार्सच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे.

लोकप्रिय महिला स्टार्सच्या यादीत दीपिकानं पटकावलं पहिलं स्थान
SHARES

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणनं पुन्हा एकदा २०२०च्या सर्वाधिक लोकप्रिय महिला स्टार्सच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. आपला विजय कायम राखत, अभिनेत्रीनं तिच्या नम्र, निष्ठावंत फॅनबेसच्या जोरावर जगभरात लोकप्रियता मिळवण्याची ही पहिली वेळ नाही. या यादीत शीर्षस्थानी पोहोचणं यात काही आश्चर्य नाही कारण दीपिका आतापर्यंत इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री आहे.


तिनं वेळोवेळी अभिनेत्री आणि एक कलाकार म्हणून आपले कौशल्य सिद्ध केलं आहे. कोणत्याही चित्रपट शैलीबद्दल बोलायचं झालं तर दीपिकानं नेहमीच तिचा अभियन सादर केला आहे. ज्यासाठी तिला 'द बॉलिवूडची क्वीन' म्हटलं जातं.

गेल्या १३ वर्षात दीपिकानं ज्या पद्धतीनं प्रेक्षकांशी आपलं नातं जोडलं आहे ते खूप कौतुकास्पद आहे. ग्लोबल स्टार म्हणून मान्यता मिळण्याबरोबरच ती देशातील घराघरा पोडोचली आहे.

रिपोर्ट्सनुसार, यंदा दीपिका एकाच वेळी दोन वेगवेगळ्या चित्रपटाच्या सेटचा भाग असेल. दोन वेगवेगळ्या चित्रपटांदरम्यान तिची धावपळ पाहायला मिळेल.Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा