Advertisement

दिलिप कुमार-मधुबाला यांची अधुरी प्रेमकहाणी, 'या' घटनेनंतर आला नात्यात दुरावा

दिलीप कुमार यांची 'लव्ह लाइफ' देखील फार रंजक आहे. दिलिप कुमार यांनी सायरा बानो यांच्याशी लग्न केलं असलं तरीही मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या प्रेमाच्या चर्चा फार काळ रंगल्या.

SHARES
01/9
दिलिप कुमार-मधुबाला यांची अधुरी प्रेमकहाणी, 'या' घटनेनंतर आला नात्यात दुरावा
मधुबाला आणि दिलिप कुमार यांचं ऐकमेंकावर फार प्रेम होते. कामिनी कौशल यांच्यानंतर दिलीप साहेबांनी मधुबालाला आपल्या जोडिदाराच्या रुपात बघितले होते.
02/9
दिलिप कुमार-मधुबाला यांची अधुरी प्रेमकहाणी, 'या' घटनेनंतर आला नात्यात दुरावा
मधुबालाबरोबरसुद्धा दिलीप साहेबांनी एकुण चार सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. तराना, संगदिल, अमर आणि मुगल-ए-आजम या सिनेमांमध्ये दिलीप कुमार-मधुबाला ही जोडी झळकली होती.
03/9
दिलिप कुमार-मधुबाला यांची अधुरी प्रेमकहाणी, 'या' घटनेनंतर आला नात्यात दुरावा
दिलीप कुमार यांनी त्यांच्या आत्मकथेमध्येच कबुल केलं होतं की, त्यांना मधुबाला आवडू लागल्या होत्या. दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं पण मधुबाला यांच्या वडिलांची या नात्याला परवानगी नव्हती.
04/9
दिलिप कुमार-मधुबाला यांची अधुरी प्रेमकहाणी, 'या' घटनेनंतर आला नात्यात दुरावा
मधुबाला यांच्या वडिलांना दिलीप कुमार पसंत नव्हते. 'नया दौर' दरम्यान झालेल्या कोर्ट केसमुळे तर दिलीप कुमार आणि मधुबाला यांचे वडील यांच्यामध्ये वादाची ठिणगीच पडली.
05/9
दिलिप कुमार-मधुबाला यांची अधुरी प्रेमकहाणी, 'या' घटनेनंतर आला नात्यात दुरावा
'नया दौर' या शूटिंग दरम्यान ४० दिवस आउटडोअर शूट करायचं होतं. पण मधुबालांचे वडील याकरता तयार नव्हते. त्यामुळे बीआर चोप्रा यांनी वैजयंतीमाला यांना संधी दिली. हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं आणि दिलीप कुमार यांनी दिग्दर्शकाच्या बाजुने साक्ष दिली. यामुळे दिलीप कुमार-मधुबाला यांच्या लव्हस्टोरीवर परिणाम झाला होता. त्यानंतर दिलीप कुमार यांनी मधुबाला यांना लग्नासाठी विचारलं असता मधुबालांनी दिलीप कुमार यांना त्यांच्या वडिलांची माफी मागण्यास सांगितलं. या गोष्टीस दिलीप कुमार यांनी नकार दिला होता. यावेळी दिलीप कुमार आणि मधुबाला पूर्णपणे वेगळे झाले.
06/9
दिलिप कुमार-मधुबाला यांची अधुरी प्रेमकहाणी, 'या' घटनेनंतर आला नात्यात दुरावा
मीडिया अहवालांच्या मते 'मुगल-ए-आझम' च्या चित्रीकरणावेळी त्यांनी सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना ओळख दाखवणंही बंद केलं होतं.
07/9
दिलिप कुमार-मधुबाला यांची अधुरी प्रेमकहाणी, 'या' घटनेनंतर आला नात्यात दुरावा
यानंतर 1966 मध्ये दिलीप कुमार यांचा सायरा बानो यांच्याबरोबर संसार सुरू झाला. मधुबाला यांनी देखील किशोर कुमार यांच्याशी लग्न केलं.
08/9
दिलिप कुमार-मधुबाला यांची अधुरी प्रेमकहाणी, 'या' घटनेनंतर आला नात्यात दुरावा
जेव्हा मधुबाला खूप आजारी पडल्या होत्या त्यावेळी दिलीप कुमार यांनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. आणि ते मधुबाला यांना भेटायला गेले देखील होते. मधुबाला यांची अवस्था पाहून दिलिप कुमार यांना फार वाईट वाटले.
09/9
दिलिप कुमार-मधुबाला यांची अधुरी प्रेमकहाणी, 'या' घटनेनंतर आला नात्यात दुरावा
बीबीसीच्या मते मधुबाला यांनी दिलीप कुमार यांचे पाणावलेले डोळे पाहून असं म्हटलं होतं की, ' हमारे शहजादे को उनकी शहजादी मिल गई, मै बहुत खुश हूं.' १९६९ साली वयाच्या अवघ्या ३५व्या वर्षीच मधुबाला यांचं निधन झालं होतं.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा