Advertisement

रोहित शेट्टीनं मुंबई पोलिसांसाठी दिली आपली ८ हॉटेल्स

रोहित शेट्टी (Rohit Shetty) आता मुंबई पोलिसांसाठी (Mumbai Police) पुढे आला आहे.

रोहित शेट्टीनं मुंबई पोलिसांसाठी दिली आपली ८ हॉटेल्स
SHARES

कोरोनाशी (Coronavirus) जगभर लढा दिला जात आहे. अशा परिस्थितीत COVID 19 च्या विरोधात लढा देण्यासाठी अनेक कलाकार पुढे सरसावले आहेत. एकीकडे दक्षिण फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकार लोकांच्या मदतीला धावून आले आहेत. बॉलिवूडही कलाकार देखील मागे नाहीत. बॉलिवूड कलाकार केवळ आर्थिक मदतीसाठी पुढे येत नाहीत तर कोरोनाशी लढा देणाऱ्या योद्धांचे संभाव्य मार्गानं मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत रोहित शेट्टी (Rohit Shetty) आता मुंबई पोलिसांसाठी (Mumbai Police) पुढे आला आहे.

ज्यावेळी आपल्यावर कोणतेही संकट येते त्यावेळी आपल्या सुरक्षेसाठी कायम पोलीसच धावून येतात. पण आता याच पोलिसांच्या मदतीला बॉलीवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी धावून आला आहे. रोहित शेट्टीनं कोरोना व्हायरससोबत लढण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या पोलिसांसाठी शहरभरात ८ हॉटेल्सची व्यवस्था केली आहे. मुंबई पोलिसांनी त्याच्या या मदतीसाठी ट्विट करत त्याचे आभार मानले आहेत.

ऑन-ड्युटी पोलिसांना या हॉटेल्समध्ये थोडा वेळ आराम करता येणार आहे. हे हॉटेल्स आंघोळ किंवा कपडे बदलण्यासाठीही सोयीस्कर ठरतील. त्यांना तिथं नाश्ता आणि जेवणसुद्धा देण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसशी लढण्यात आणि मुंबईला सुरक्षित ठेवण्यात आम्हाला साथ दिल्याबद्दल धन्यवाद, असं म्हणत मुंबई पोलिसांनी त्याचे आभार मानले आहेत.

रोहितच्या या कामाचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. या मदतीबद्दल सोशल मीडिया वापरकर्ते रोहित शेट्टीचे कौतुक करीत आहेत. त्याची तुलना हिरोसोबत केली जात आहे. दरम्यान, काही नेटकरी रोहितला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण रोहितचे चाहतेही ट्रोलर्सचा चांगलाच क्लास घेताना दिसत आहेत.

रोहित शेट्टींच्या अगोदर सोनू सूद (Sonu Sood)नंही आपली हॉटेल्स क्वारंटाईन आणि कोरोना योद्धासाठी उघडली आहेत. त्याचबरोबर अभिनेत्री आयशा टाकियाच्या पतीनेही मदत म्हणून हॉटेल्स दिली आहेत. यासोबतच शाहरुख खाननं मदतीसाठी त्यांचे कार्यालयही दिलं आहे.

महत्त्वाचं म्हणजे या अडचणीच्या वेळी संपूर्ण बॉलिवूड (Bollywood) पुढे येऊन मदत करत आहेत. अक्षय कुमार, शाहरुख खान, शिल्पा शेट्टी, वरुण धन, कपिल शर्मा, विक्की कौशल, आलिया भट्ट यांच्यासह अनेक स्टार आर्थिक मदतीसाठी पंतप्रधान आणि सीएम केअरमध्ये सामील झाले आहेत. यासह, मानसिकदृष्ट्या हे कलाकार देखील आपल्या चाहत्यांना प्रोत्साहन देत आहेत.



हेही वाचा

किंग खानची पालिकेला पुन्हा मदत, राजेश टोपेंनी मानले आभार

लॉकडाऊनचे नियम तोडणाऱ्यांवर सलमान खान भडकला

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा