Advertisement

'सिंबा'च्या मागे ११ मराठमोळ्या कलाकारांची फौज

सिध्दार्थनं या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. याबाबत तो म्हणतो की, रोहितसर मनाने राजा माणूस आहेत. ते ब्लॉकबस्टर फिल्ममेकर असल्याचं मला त्यांच्यासोबत 'गोलमाल' चित्रपट करतानाच कळलं होतं. त्यानंतर मराठी सिनेमात व्यग्र झाल्याने त्यांनी ऑफर केलेले पुढचे दोन सिनेमे मी करू शकलो नाही. ती कसर 'सिंबा'ने भरून काढली आहे.

'सिंबा'च्या मागे ११ मराठमोळ्या कलाकारांची फौज
SHARES

नायक कितीही बलवान असला तरी त्याला सहकलाकारांची साथ लागतेच. सध्या जोरदार चर्चेत आहे तो रणवीर सिंगने साकारलेल्या नायक म्हणजेच 'सिंबा'ची. या नायकाच्या मागे उभी आहे मराठमोळ्या कलाकारांची भलीमोठी फौज... 


२८ डिसेंबरला रिलीज 

धर्मा प्रॉडक्शन्स आणि रोहित शेट्टी पिक्चर्सचा चित्रपट 'सिंबा' २८ डिसेंबरला रिलीज होणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंबा'मध्ये रणवीर सिंह, सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. त्यासोबतच सौरभ गोखले, अश्विनी काळसेकर, विजय पाटकर, नेहा महाजन, अशोक समर्थ, वैदेही परशुरामी, अरूण नलावडे, सुलभा आर्या, नंदू माधव, सुचित्रा बांदेकर आणि सिध्दार्थ जाधव असे अकरा मराठी कलाकारही महत्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.


लग्नाचं आमंत्रण

सिध्दार्थनं या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. याबाबत तो म्हणतो की, रोहितसर मनाने राजा माणूस आहेत. ते ब्लॉकबस्टर फिल्ममेकर असल्याचं मला त्यांच्यासोबत 'गोलमाल' चित्रपट करतानाच कळलं होतं. त्यानंतर मराठी सिनेमात व्यग्र झाल्याने त्यांनी ऑफर केलेले पुढचे दोन सिनेमे मी करू शकलो नाही. ती कसर 'सिंबा'ने भरून काढली आहे. यावेळी तर करण जोहरसारख्या निर्मात्यासोबत काम करायची संधी मिळाली. रणवीरसारख्या सुपरस्टार्सने माझा वाढदिवस साजरा करावा किंवा मला आपल्या लग्नाचं आमंत्रण दिल्याने मी खूप भारावून गेलो आहे. 


विश्वासच बसला नाही

वैदेहीनं या चित्रपटात आकृती ही महत्वाची भूमिका साकारली आहे. ती सिंबाच्या अनुभवाविषयी  म्हणाली की, 'सिंबा'साठी जेव्हा मला बोलावण्यात आलं होतं, तेव्हा मला विश्वासच बसला नाही. कोणीतरी माझी मस्करी करतंय असंच मला वाटलं. पण जेव्हा मी रोहितसरांना भेटले, तेव्हा मला पाहताच ते म्हणाले होते, हीच 'सिंबा'मधली आकृती आहे. सिनेमा स्विकारल्यावर मला रणवीर, सारा आणि इतर मराठी कलाकारही या सिनेमात असल्याचं कळलं.


रणवीरकडून खूप शिकले

रोहितच्या चित्रपटांमध्ये सर्वाधिक दिसलेली अभिनेत्री आहे अश्विनी काळसेकर. रोहितसोबत सहाव्यांदा काम करणारी अश्विनी म्हणाली की, मी रोहित शेट्टी यांना 'हिट मशीन' म्हणते. त्यांच्या परिसस्पर्शाने प्रत्येक चांगल्या कथानकाचा उत्तम सिनेमा बनतो आणि तो सुपरहिट होतो. रोहित यांची शिस्त, वक्तशीरपणा आणि त्यांच्यातला सळसळता उत्साह पाहून मी कलाकार म्हणून समृध्द होत गेले. 'सिंबा'मुळे मला रणवीर सिंहसोबत काम करण्याची संधी मिळाली. रणवीरकडूनही मी कळत-नकळत खूप शिकले. त्याच्याएवढा भूमिकेचा अभ्यास करणारा कलाकार मी पाहिला नाही. 


सकारात्मकता शिकले

सुचित्रा बांदेकर म्हणाल्या की, मी 'सिंघम'मध्ये रोहितसरांसोबत काम केलं होतं. त्यानंतर आता 'सिंबा'मुळे पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करता आलं. अजय देवगण आणि रणवीर सिंह या दोन सुपरस्टार्ससोबत काम करण्याचा खूप वेगळा अनुभव होता. अजयसर जेवढे शांत तेवढाच रणवीर बोलका. रोहितसर आणि त्यांच्या टीमसोबत काम करताना मला अडचणींवर मात करताना व्यक्तिमत्वात आवश्यक असलेली सकारात्मकता शिकायला मिळाली.


मराठी नटांसोबत मजा

रोहितच्या सिनेमात पाचव्यांदा काम करणारे विजय पाटकर म्हणाले की, अभिनेत्यांकडून चांगला अभिनय करून घ्यायचा असेल, तर त्यांना रिलॅक्स करावं लागतं, हे रोहित यांना चांगलं माहीत आहे. मला रोहित शेट्टींचं काटेकोरपणे काम करणं आवडतं. मराठी नटांसोबत काम करताना मजा येते, असं नेहमी रोहित शेट्टी म्हणतात.


अविस्मरणीय प्रवास

अशोक समर्थही या चित्रपटात एका वेगळ्याच रूपात दिसणार आहेत. या चित्रपटात काम करण्याच्या अनुभवाबाबत ते म्हणाले की, मला माझ्या आयुष्यातली पहिली कमर्शिअल हिट फिल्म पाहायला मिळाली, ती रोहित शेट्टींमुळेच. 'सिंघम'मुळे मी १०० कोटी क्लबमध्ये गेलो. 'सिंघम' ते 'सिंबा' हा अविस्मरणीय प्रवास आहे. भारतीय सिनेसृष्टीतला आघाडीचा नट असलेल्या रणवीर सिंहकडून आपल्या अगोदरच्या सिनेमातल्या अभिनयाविषयी कौतुकाची थाप मिळावी, ही माझ्यासारख्या अभिनेत्यासाठी आनंदाचीच बाब होती.हेही वाचा - 

'ठाकरे' जुमानणार का सेन्सॅारचा आदेश?

सलमान हिंदीत बनवणार ‘मुळशी पॅटर्न’
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा