Advertisement

सलमान हिंदीत बनवणार ‘मुळशी पॅटर्न’


सलमान हिंदीत बनवणार ‘मुळशी पॅटर्न’
SHARES

आजवर बऱ्याच मराठी सिनेमांचे हिंदी रिमेक प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटांच्या यादीत आता ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचाही समावेश होणार आहे.


चित्रपटाच्या प्रेमात

अभिनेता सलमान खान ‘मुळशी पॅटर्न’च्या इतका प्रेमात आहे की, त्याने या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मुळशी पॅटर्न’ या मूळ मराठी चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन प्रवीण तरडेने केलं आहे. या चित्रपटात प्रवीणने शेतकऱ्यांची कथा मांडताना त्यांच्या व्यथाही मार्मिकपणे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.


आयुष मुख्य भूमिकेत

‘मुळशी पॅटर्न’मध्ये अभिनेता ओम भूतकरने मुख्य भुमिका साकारली आहे, तर हिंदी चित्रपटात सलमानचा भावोजी आयुष शर्मा नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सलमानचीच निर्मिती असलेल्या ‘लव्हयात्री’ या चित्रपटाद्वारे आयुषने बालिवुडमध्ये पदार्पण केलं आहे. बऱ्याच वाद-विवादानंतर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बाॅक्स आफिसवर मात्र म्हणावं तसं यश मिळवता आलेलं नाही. याउलट मराठी ‘मुळशी पॅटर्न’ने तिकिटबारीवर चांगलाच गल्ला जमवला आहे.


दिग्दर्शन कुणाचं?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान फिल्म्सने नुकतेच ‘मुळशी पॅटर्न’च्या हिंदी रिमेकचे हक्क खरेदी केले आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाची, तसंच चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना अद्याप रिव्हील करण्यात आलेली नाही. या चित्रपटातील इतर कलाकारांची निवडही अद्याप झालेली नसल्याचं समजत आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सलमान कोणाकडे सोपावतो ते पाहायचं आहे.हेही वाचा-

Exclusive Interview: ... तर आम्ही घरात घुसून मारू- विकी कौशल

मिका सिंगला दुबईत अटक, लैंगिक शोषणाचा आरोपसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा