Advertisement

Exclusive Interview: ... तर आम्ही घरात घुसून मारू- विकी कौशल

नवोदित दिग्दर्शक आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'उरी - द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटात विकीने मुख्य भूमिका साकारली आहे. उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून अतिरेक्यांना कंठस्नान घातलेल्या घटनेवर या चित्रपटाचं कथानक बेतलेलं आहे.

Exclusive Interview: ... तर आम्ही घरात घुसून मारू- विकी कौशल
SHARES

'मसान', 'राझी', 'मनमर्जियां' या प्रत्येक चित्रपटागणिक यशाची एकेक पायरी चढत अल्पावधीत चित्रपटसृष्टीत आपलं अढळस्थान निर्माण करण्याच्या दृष्टीने वाटचाल करणारा विकी कौशल पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. नवोदित दिग्दर्शक आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'उरी - द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटात विकीने मुख्य भूमिका साकारली आहे. उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून अतिरेक्यांना कंठस्नान घातलेल्या घटनेवर या चित्रपटाचं कथानक बेतलेलं आहे. अॅक्शन डायरेक्टर शाम कौशल यांचा मुलगा असलेल्या विकीने या चित्रपटाच्या निमित्ताने 'मुंबई लाइव्ह'शी एक्सक्लुझीव्ह बातचीत करत 'उरी'चा प्रवास उलगडला.


सर्जिकल स्ट्राइक म्हणजे

युद्ध म्हणजे काय याची कल्पना असली, तरी सर्जिकल स्ट्राइकबाबत मला अगोदर काहीच ठाऊक नव्हतं. इंडियन आर्मीने असं काही तरी आॅपरेशन केल्याचं मी प्रथम न्यूजमध्ये ऐकलं. त्यामुळे याबाबत कुतूहल होतं. एक छोटीशी टोळी जाते आणि आपलं मिशन पूर्ण करून परतते. हे अनडिक्लेअर वॅार असतं. हे जेव्हा झालं तेव्हा सर्वांनाच भारतीय असल्याचा गर्व वाटला होता. आपल्या सैनिकांचा अभिमान वाटावा असा तो क्षण होता.


... तर आम्ही घरात घुसून मारू

इंडियन आर्मी गप्प बसत नाही. त्यामुळे इतरांना समजलं की यांना ग्रँटेड धरलं जाऊ शकत नाही. आमच्या घरात जर हल्ला कराल, तर आम्ही तुमच्या घरात घुसून मारू हा संदेश त्यामागे होता. एक ठोस पाऊल उचललं गेलं असं मी मानेत. हा पाकिस्तानी नागरिकांवरील हल्ला नव्हता, तर प्रॅापर्ली रिसर्च करून त्यांच्या केवळ मिलिटंट्सवर हल्ला होता जे उरी घातपातासाठी जबाबदार होते. जे पुढेही हल्ले करण्याच्या तयारीत होते. केवळ त्यांना धडा शिकवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली होती.


दोन युनिफॅार्ममधील फरक?

यापूर्वी 'राजी'मध्ये पाकिस्थानी युनिफॅार्म परिधान केला होता. त्या चित्रपटात मी पाकिस्तानी आर्मीमॅनचा रोल केला होता, तेव्हा ती एक इंन्फीट्री आर्मी होती. हा स्पेशल फोर्सेस पॅरा कमांडो आहे. खूप खास मिशन्ससाठी यांची निवड केली जाते आणि तयार केला जातं. दोन्हींमध्ये हाच फरक आहे. ती एक ड्रामा फिल्म होती, जी अॅान ग्राऊंड नव्हती, पण ही आॅनग्राऊंड आणि वास्तवदर्शी फिल्म आहे. हा चित्रपटच मूळात त्या मिशनवर आधारित आहे. 

यात खूप अॅक्शन आहे. त्यात ड्रामा होता. त्याच्यासाठी वेगळी ट्रेनिंग होती. यात गन चालवण्याची गरज होती. एसएफ कमांडो जेव्हा आॅपरेशन करतात, तेव्हा ते कसे आठ-दहाच्या टोळीमध्ये जातात. त्यांची साइन लँग्वेज, कोडवर्डस कसे असतात ते शिकावं लागलं. तिथे एक घरगुती मिलिट्री लाइफ होती, पण इथे आॅनफिल्डवर होतो.


फिक्शन कॅरेक्टर

डिफेन्सचे काही प्रोटोकॅाल असतात. जे तुम्हाला फॅालो करावे लागतात. सिक्युरीटीच्या कारणांमुळे काही इन्फर्मेशन पब्लिकला दिली जात नाही. त्यांचा एक प्रोटोकॅाल असतो की, जेव्हा एखादी टीम सर्जिकल स्ट्राइक करून येते तेव्हा त्यांची ओळख ते जाहीर करत नाहीत. त्यांनी आम्हालाही सांगितलं नाही आणि आम्हीही चित्रपटात दाखवलेलं नाही. त्यामुळे यातील कॅरेक्टर्स फिक्शनल आहेत. जी माहिती पब्लिकपर्यंत जाऊ द्यायची नाही केवळ तीच आम्ही फिक्शनल केली आहे. बाकी सर्व वास्तव घडलेल्या घटनांवरून प्रेरीत आहे.


दुखापतही झाली

ट्रेनिंग करताना ओव्हर एक्झरशनमुळे टेनिस एल्बोची दुखापत झाली होती. आतले मसल्स बर्न आऊट झाले होते. त्यामुळे २५ दिवसांची फिजिओथेरेपी घ्यावी लागली होती. त्यासोबतच अॅक्शन सिक्वेन्सही शूट करत होतो. तेवढीच दुखापत झाली होती, पण आता ठीक झाली आहे. या व्यक्तिरेखेसाठी मला वजनही वाढवावं लागलं होतं. १५ किलो वजन वाढवलं होतं. हे बॅाडीसाठी सोपं आणि हेल्दी नसतं, पण रोलसाठी आवश्यक असेल तर करणारच. यासाठी ६ महिने लागले.


सैनिकांचं जीवन समजलं

देशभक्तीची भावना मनात जन्मजातच होती. पण या चित्रपटामुळे सैनिकांच्या लाईफमध्ये डोकावण्याची संधी मिळाली. त्यांचं कुटुंब कसं असतं. त्याचा त्याग कसा असतो. आर्मीमध्ये जेव्हा एखादी व्यक्ती लढत असते, तेव्हा केवळ ज्याच्या हातात बंदूक आहे केवळ तोच लढत नसतो तर त्याच्या घरी जे कुटुंब असतं ते देखील युद्धात सामील असतात. महिनोंन महिने त्यांची भेट झालेली नसते. अशा जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांनाही सलाम करावासा वाटतो.


हेच खरे सुपरहिरो

स्पेशल फोर्सेस कमांडो हेच खरे सुपरहिरो आहेत. यांची ट्रेनिंग खूप खडतर असते. ही ट्रेनिंग नॅार्मल व्यक्ती पूर्ण करू शकत नाही. यांना केवळ शरीरानेच नव्हे, तर मनानेही स्ट्राँग बनवलं जातं. यासाठी स्वत: हून पुढाकार घेऊन जे येतात त्यांनाच घेतलं जातं. इथे एकदा फेल झाल्यावर पुन्हा अप्लाय करू शकत नाही. कधी कधी ४०० मधून एक सोल्जर सिलेक्ट होतो. यात एक सिनीयर तुम्हाला रगडवून घेत असतो, तर दुसरा सांगतो कशाला करतोस इतकी मेहनत. हा एक प्रकारे माइंड गेम असतो. ते तुम्हाला जीवंत हत्यार बनवतात.


खडतर ट्रेनिंग

माझ्यासाठी एक ट्रेनर हायर करण्यात आला होता. सकाळी उठून खूप ट्रेनिंग करायचो. अक्षरश: धूर निघायचा. प्रथम २० लोकांची इन्ड्योरा ट्रेनिंग घेण्यात आली. बॅाडी लँग्वेज शिकवण्यात आली. इथे वॅार्म अपच ग्राऊंडचे २५ राऊंड धावावे लागायचे. एकमेकांना खांद्यावर घेऊन धावणं. पाण्याविना ३ तास ट्रेनिंग करणं. हे सर्व झाल्यानंतर कफ परेडमध्ये एका शीख रेजीमेंटने त्यांच्या ट्रेनिंग ग्राऊंडवर आम्हाला आर्मीचं प्रशिक्षण दिलं. त्यात अंडरग्राऊंड कोपरांवर चालणं, उड्या मारणं, पाईपमधून जाणं हे शिकवलं गेलं. कित्येकदा जोड्यांच्या माध्यमातून काम करणं. याशिवाय रशीच्या आधारे हेलिकॅाप्टरमधून खाली उतरणं. हे सर्व आम्ही शूटिंग पूर्वी ३ महिने केलं.


नवोदित दिग्दर्शकाचा अनुभव

स्क्रीप्ट वाचली तेव्हा हा चित्रपट करायलाच हवा असं वाटलं. दिग्दर्शकाला भेटलो तेव्हा त्याचं व्हिजन जाणून घेतलं आणि विचार पक्का झाला. नवोदित दिग्दर्शकाकडे नवीन उर्जा असते. आदित्य धर एक पॅशनेट डायरेक्टर आहे. प्रेमाने आणि रिसर्च करून काम करतो. त्याने या चित्रपटासाठी खूप अभ्यास केला आहे. या चित्रपटात मी मेजर विहान शेरगील, तर परेश रावल यांनी अजित डोवाल यांची भूमिका साकारली आहे. परेशजींसारख्या दिग्गज अभिनेत्यासोबत दुसऱ्यांदा काम करण्याची संधी मिळाली. ते खूप चिल्ड आऊट असतात. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा येते.


पप्पांचा मोलाचा सल्ला

अॅक्शन फिल्म करण्याची इच्छा पूर्ण झाली. पप्पा एक अॅक्शन डायरेक्टर असले तरी त्यांचा हाच सल्ला होता की, जोश में नहीं होश में काम करना. भूमिका साकारताना खरोखर बॅार्डरवर पोहोचू नकोस. कारण एक दुखापत झाली, तर २० दिवस शूटिंग थांबतं. त्यामुळे खूप सांभाळून कर. स्वत: ची सेफ्टी पाहून कर हेच त्यांनी सांगितलं. पूर्ण ताकदीनिशी कर, पण काळजी घे. पप्पांचे हे शब्द कायम स्मरणात राहणारे आहेत.



हेही वाचा-

भरकटलेली 'केदारनाथ'ची यात्रा!

मिका सिंगला दुबईत अटक, लैंगिक शोषणाचा आरोप



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा