Advertisement

शर्लिन चोप्रा, पूनम पांडेला दिलासा; २० सप्टेंबरपर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश

पॉर्न व्हिडीओची निर्मिती तसेच अश्लील चित्रीकरणात सहभागाप्रकरणी अभिनेत्री शार्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.

शर्लिन चोप्रा, पूनम पांडेला दिलासा; २० सप्टेंबरपर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश
SHARES

पॉर्न व्हिडीओची निर्मिती तसेच अश्लील चित्रीकरणात सहभागाप्रकरणी अभिनेत्री शार्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. दोघींवर २० सप्टेंबरपर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

राज कुंद्राच्या अटकेनंतर पॉर्नोग्राफी रॅकेट प्रकरणी मुंबई पोलिसांनी आघाडी उघडली आहे. अभिनेत्री गेहना वसिष्ठने पॉर्न चित्रपट बनवून ते एका कंपनीला विकल्याचे प्रकरण गाजत असतानाच अभिनेत्री शार्लिन चोप्रानेही अश्लील व्हिडीओची निर्मिती केल्याचे प्रकरण उघडकीस आले. युकेतील एका कंपनीने शार्लिन चोप्रासोबत अश्लील चित्रपट निर्मितीबाबत करार केला होता.

पेड कंटेंट असलेल्या या चित्रपटाची पायरेटेड कॉपी निघाली. त्यामुळे अश्लील चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन आणि त्यात अभिनय केल्याप्रकरणी शार्लिनविरोधात मुंबई पोलिसांनी आय.टी. कायद्यांतर्गत ६ नोव्हेंबर २०२० रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तर अभिनेत्री पूनम पांडेविरोधातही मुंबई पोलिसांनी अश्लील चित्राकरणाप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी फेब्रुवारी महिन्यात शर्लिन चोप्राने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. या अर्जाची गंभीर दखल घेतल शर्लिनला 15, 16, 17 मार्च रोजी मुंबई पोलिसांसमोर हजर राहून चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते. तोपर्यंत तिच्या विरोधात कोणतीही कठोर कारवाई करू नये असे, निर्देशही मुंबई पोलिसांना देण्यात आले होते. दिलेल्या निर्देशांनुसार शर्लिन चोप्रा वेळोवेळी चौकशीला हजर झाल्यानं तिच्या अटक पूर्व जामीनाची मुदत वेळोवेळी वाढवण्यात आली.

या दोन्ही प्रकरणात अटकपूर्व जामीनासाठी दोघींनीही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर न्या. सारंग कोतवाल यांच्यापुढे शार्लिन आणि पूनम दोघींच्या याचिकेवर एकत्रित सुनावणी पार पडली. त्याची दखल घेत खंडपीठाने २० सप्टेंबरपर्यंत शार्लिन चोप्रा आणि पूनम पांडे विरोधात कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा