Advertisement

'फायटर'मध्ये हृतिक रोशनसोबत झळकणार दीपिका पदुकोण

विशेष म्हणजे दीपिकासोबतचा हृतिकचा हा पहिलाच चित्रपट असले.

'फायटर'मध्ये हृतिक रोशनसोबत झळकणार दीपिका पदुकोण
SHARES

अभिनेता हृतिक रोशननं आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचं नाव फायटर असून यात तो दीपिका पदुकोण सिल्व्हर स्क्रिन शेअर करणार आहे. विशेष म्हणजे दीपिकासोबतचा हृतिकचा हा पहिलाच चित्रपट असले.

सिद्धार्थ आनंद या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार असून पुढील वर्षी म्हणजे ३० सप्टेंबर २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल. हृतिकनं या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हृतिकनं चित्रपटाचा टीझर शेअर करताना हा चित्रपट भारतीय लष्करातील एका सैनिकावर आधारित असेल, असं सांगितलं आहे. चित्रपटाचं दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्यासह हृतिक तिस-यांदा काम करणार आहे. यापूर्वी या जोडीनं वॉर आणि बँग बँगमध्ये एकत्र काम केलं होतं. मार्फ्लिक्स बॅनरच्या या चित्रपटाची ममता-सिद्धार्थ निर्मिती करत आहेत. वृत्तानुसार, हृतिक आणि दीपिका दोघेही या चित्रपटात स्टंट करताना दिसणार आहेत.

डिसेंबर २०१९ मध्ये दीपिका-हृतिक एका पार्टीत एन्जॉय करताना दिसले. त्यावेळी दोघांचा पार्टीतील व्हिडिओ व्हायरल झाला होता. तेव्हा चाहत्यांनी दोघांना मोठ्या पडद्यावर एकत्र बघण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

इतकेच नाही तर ५ जानेवारी रोजी जेव्हा हृतिकनं दीपिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या त्यावेळी दीपिका म्हणाली होती की, येणाऱ्या दिवसांत डबल सेलिब्रेशन होणार आहे. दीपिकाच्या या पोस्टनंतर हे दोघेही लवकरच चित्रपटाची घोषणा करू शकतात असा अंदाज चाहत्यांकडून व्यक्त केला जात होता.Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा