अॅमी जॅक्सनच नाही, तर या अभिनेत्रीसुद्धा झाल्यात लग्नाआधी प्रेग्नंट!

लग्नाआधीच प्रेग्नंट राहिलेली अॅमी मागील काही महिन्यांपासून चर्चेत होती. तिचा बाॅयफ्रेंड जाॅर्ज पानायियेतो आणि बाळासोबतचा फोटो तिने नुकताच इन्स्ट्राग्रामवर शेअर केला.

  • अॅमी जॅक्सनच नाही, तर या अभिनेत्रीसुद्धा झाल्यात लग्नाआधी प्रेग्नंट!
  • अॅमी जॅक्सनच नाही, तर या अभिनेत्रीसुद्धा झाल्यात लग्नाआधी प्रेग्नंट!
  • अॅमी जॅक्सनच नाही, तर या अभिनेत्रीसुद्धा झाल्यात लग्नाआधी प्रेग्नंट!
  • अॅमी जॅक्सनच नाही, तर या अभिनेत्रीसुद्धा झाल्यात लग्नाआधी प्रेग्नंट!
  • अॅमी जॅक्सनच नाही, तर या अभिनेत्रीसुद्धा झाल्यात लग्नाआधी प्रेग्नंट!
  • अॅमी जॅक्सनच नाही, तर या अभिनेत्रीसुद्धा झाल्यात लग्नाआधी प्रेग्नंट!
  • अॅमी जॅक्सनच नाही, तर या अभिनेत्रीसुद्धा झाल्यात लग्नाआधी प्रेग्नंट!
  • अॅमी जॅक्सनच नाही, तर या अभिनेत्रीसुद्धा झाल्यात लग्नाआधी प्रेग्नंट!
SHARE

रजनीकांत आणि अक्षय कुमार अशा सुपरस्टारसोबत ‘2.0’ सिनेमात काम करणारी अभिनेत्री अॅमी जॅक्सन हिने नुकताच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. लग्नाआधीच प्रेग्नंट राहिलेली अॅमी मागील काही महिन्यांपासून चर्चेत होती. तिचा बाॅयफ्रेंड जाॅर्ज पानायियेतो आणि बाळासोबतचा फोटो तिने नुकताच इन्स्ट्राग्रामवर शेअर केला. 

या फोटोत जाॅर्ज तिच्या कपाळाचं चुंबन घेताना दिसत आहे, तर अॅमी बाळाला दूध पाजताना दिसत आहे. अॅमीनं तिच्या बाळाचं नाव अँड्रियास असं ठेवलं आहे. लग्नाआधीच बाळाला जन्म देण्याच्या अॅमीच्या निर्णयामुळे बाॅलिवूडमध्ये खमंग चर्चा रंगली आहे. परंतु लग्नाआधी प्रेग्नंट राहिलेली अॅमी एकमेव अभिनेत्री नाही. 

सेलिना जेटली 

अभिनेत्री सेलिना जेटली ने २०११ मध्ये आस्ट्रेलियन बॉयफ्रेंड पीटर हॉग सोबत लग्न केलं. या लग्नानंतर अवघ्या ७ महिन्यांच्या आत तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. यावरून स्पष्ट होतं की सेलिना लग्नाआधीच प्रेग्नंट होती.   

कोंकणा सेन शर्मा 

अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा आणि अभिनेता रणवीर शौरी एकमेकांना १ वर्षांहून अधिक काळ डेट करत होते. त्यातून कोंकणा प्रेग्नंट राहिली. ती ६ महिन्यांची प्रेग्नंट असताना दोघांनी लग्न केलं. दुर्दैवाने त्यांचं लग्न फक्त ५ वर्षेच टिकलं. २०१५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. 

महिमा चौधरी

बॉबी मुखर्जी सोबत लग्न करण्याआधीच अभिनेत्री महिमा चौधरी प्रेग्नंट राहिली होती. या बातमीचा खुलासा महिमाच्या जवळच्या एका व्यक्तीने केला होता.   

नीना गुप्ता 

‘बधाई हो’ या गाजलेल्या सिनेमातील ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता प्रसिद्ध वेस्ट इंडियन क्रिकेटपटू व्हिवियन रिचर्ड्ससोबत डेट करत होती. त्यातून ती प्रेग्नंट राहिली आणि तिचा मसाबा ही मुलगी झाली. मसाबा नामांकीत फॅशन डिझायनर आहे. रिचर्ड्स यांचं आधी लग्न झालेलं असल्याने या दोघांना लग्न करता आलं नाही. परंतु रिचर्ड्स आणि नीना गुप्ता अजूनही एकमेकांना भेटतात.

श्रीदेवी 

बॉलिवूडमधील सदाबहार अभिनेत्री दिवंगत श्रीदेवी आणि सिनेनिर्माते एकमेकांना डेट करत असतानाच श्रीदेवी प्रेग्नंट राहिली होती. लोकप्रिय अभिनेत्री असून देखील त्यांनी प्रेग्नंसीची बाब लपवून ठेवली नाही. तर सार्वजनिकरित्या हे सत्य कबूल देखील केलं. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचं लग्न झालं तेव्हा श्रीदेवी ७ महिन्यांची प्रेग्नंट होती. 

वीणा मलिक

अभिनेत्री वीणा मलिक आणि प्रशांत प्रताप सिंह एकमेकांना डेट करत होते. त्याच दरम्यान वीणा प्रेग्नंट राहिली. परंतु तिच्या प्रेग्नंसीची बातमी वाऱ्यासारखी बाॅलिवूडमध्ये परसल्याने तिने अपत्याची जबाबदारी न उचलता अबाॅर्शन करणंच पसंत केलं. 

अमृता अरोरा 

अभिनेत्री अमृता अरोराने शकील लदाक सोबत लग्न केलं. लग्नानंतर ७ महिन्यांतच तिने बाळाला जन्म दिला. यावरून स्पष्ट होतं की ती लग्नाआधीच प्रेग्नंट होती.

लिसा हेडन 

‘क्वीन’ सिनेमात कंगना सोबत काम करणारी अभिनेत्री लिसा हेडनने आॅक्टोबर २०१६ मध्ये डिनो लिलवानी सोबत लग्न केलं. तिनेही लग्नानंतर ७ महिन्यात बाळाला जन्म दिला. परंतु लग्नाआधी दोघांमध्ये काही नातं होतं, हे मात्र तिनं स्वीकारलं नाही.  हेही वाचा-

'गर्ल्स' समोर आणणार पडद्यामागच्या या गोष्टी

रस्त्यावरील कुत्र्याची आयफामध्ये एन्ट्री, दिली मुलाखत, हा व्हिडिओ जिंकेल तुमचं मनसंबंधित विषय
ताज्या बातम्या