Advertisement

शुटिंगच्या पहिल्या दिवशीच जान्हवीवर संतापले 'धडक'चे दिग्दर्शक


शुटिंगच्या पहिल्या दिवशीच जान्हवीवर संतापले 'धडक'चे दिग्दर्शक
SHARES

श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि शाहीद कपूरचा भाऊ ईशांत खट्टर धर्मा प्रॉडक्शनच्या 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. सध्या दोघे या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहेत. उदयपूरमध्ये या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात झाली असून त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

फॅशन डिझायनर मनिषा मन्होत्रानं या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत दिग्दर्शक शशांक खेतान जान्हवी आणि ईशांतला रागवताना दिसत आहेत. फोटोवरून तरी असं वाटतंय की, ईशांत आणि जान्हवीला शशांक यांच्या संतापाचा सामना करावा लागला आहे. पण हे सत्य नाही. ईशांत, जान्हवी आणि शशांक यांच्यात मजा, मस्ती सुरू होती. त्यावेळी मनिष मन्होत्रानं हा फोटो क्लिक केला. फोटो क्लिक करताना या तिघांनी जाणीवपूर्वक पोज दिली आहे.
धर्मा प्रॉडक्शननंही शुटींगच्या पहिल्या दिवसाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत ईशान ब्ल्यू शर्ट आणि ग्रे पॅन्टमध्ये दिसत आहे. तर जान्हवी पिंक कलरच्या सूटमध्ये दिसत आहे. उदयपूरच्या एका तलावाच्या किनारी हा फोटो क्लिक करण्यात आला आहे.
६ जुलै २൦१८ मध्ये 'धडक' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'सैराट'वर आधारीत कथानक असल्यानं प्रेक्षकांना या चित्रपटाविषयी फार उत्सुकता आहे. ईशान आणि जान्हवी या दोघांसाठी हा चित्रपट फार महत्त्वाचा आहे. दोघांकडूनही प्रचंड अपेक्षा आहेत. जान्हवी ही श्रीदेवीची मुलगी आहे. तर ईशान शाहीद कपूरचा भाऊ आहे. सेलिब्रिटी कुटुंबातून हे दोन्ही कलाकार असल्यानं त्यांच्यावर तेवढंच दडपण आहे.हेही वाचा

चित्रपटातून शिक्षणाचा वेगळा अँगल सांगणारा 'बारायण'Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा