दिग्दर्शक दिपक पाटील आणि निर्माती देवता पाटील यांच्या ओंजळ आर्ट्स प्रॉडक्शनच्या 'बारायण' या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. 'बारायण' हे नाव नारदमुनींच्या 'नारायण नारायण' या शब्दांशी मिळते जुळते आहे. सत्ययुगात सत्यमहिमा, द्वापर युगात महाभारत, त्रेतायुगात रामायण आणि कलयुगात बारायण असे डायलॉग मोशन पोस्टर पाहताना ऐकू येतात.
शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. दहावीनंतर सुरू होणाऱ्या आर्ट्स, कॉमर्स आणि विद्याशाखा आणि त्यानंतर येणारे १२वीचे वर्ष म्हणजेच बारायण. बारावीत असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरात कशा प्रकारचं वातावरण असतं, हे या चित्रपटातून मांडण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वीच 'बारायण' चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. पोस्टरवर विशालकोन, पेन्सिल, ओरीगामी कागद, आलेख पेपर असे शैक्षणिक साहित्य पाहायला मिळत आहे. या चित्रपटात कोणते कलाकार आहेत याची माहिती मिळाली नाही. पण चित्रपटाचे नाव आणि पोस्टरचा लूक यामुळे प्रेक्षकांच्या मनात अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. १२ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा