Advertisement

दयाबेन बनली आई

दिशा वकानीने चाहत्यांना गोड बातमी दिलीये. दिशाने गुरुवारी सकाळी एका गोड परीला जन्म दिला आहे!

दयाबेन बनली आई
SHARES

'तारका मेहता का उलटा चश्मा' या सब टीव्हीवरील मालिकेतील दयाबेन म्हणजेच दिशा वकानीने चाहत्यांना गोड बातमी दिलीये. दिशाने गुरुवारी सकाळी गोड परीला जन्म दिला आहे.

दिशाने 24 डिसेंबर 2015 ला मुंबईत मयूर पांडा यांच्याशी लग्न केले होते. घरी आलेल्या परीमुळे सध्या दोघांचाही आनंद गगनात मावत नाहीये. दिशाला डॉक्टरांनी 20 डिसेंबर ही तारीख दिली होती. पण त्या आधीच दिशाने ही गोड बातमी सगळ्यांना दिली आहे. दिशाने आपले डोहाळजेवण थाटात साजरे केले होते. यावेळी तारका मेहता मालिकेच्या कलाकारांनीही हजेरी लावली होती.गेली नऊ वर्ष सुरू असलेल्या 'तारका मेहता का उलटा चश्मा' या मालिकेत दिशा पहिल्या भागापासून काम करत आहे. अगदी कमी कालावधीत दिशाने आपल्या वेगळ्या शैलीच्या बोलीने प्रेक्षकांची मने जिंकली. गरोदरपणातही काही काळ तिने मालिकेचे चित्रीकरण सुरू ठेवले होते. गरोदरपणात दिशाच्या सासूने तिची फार काळजी घेतली होती. त्या दिशाला सेटवरही सोडायला यायच्या. निर्मात्यांनी तिच्यासाठी चित्रीकरणाचे तासही कमी केले होते.त्यानंतर दिशाने चित्रीकरणामध्ये ब्रेक घेतला होता. त्यावेळी मालिका नवीन चेहऱ्याच्या शोधात आहे असे म्हटले जात होते. मात्र निर्माते असित मोदीने दिशाच या मालिकेचा भाग असल्याचे स्पष्ट केले होते.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा