Advertisement

बॉलिवूड क्वीन कंगना रणौत पुन्हा जखमी


बॉलिवूड क्वीन कंगना रणौत पुन्हा जखमी
SHARES

बॉलिवूड क्वीन कंगना रणौतच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झासी' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कंगना पुन्हा एकदा जखमी झाली आहे. कंगना 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झासी' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात काही शंका नाही की ती चित्रपटांसाठी खूप मेहनत घेते. आता हेच बघाना गेल्यावेळी शूटिंग दरम्यान कंगनाला तलवार लागली होती. जखमी असूनही ती पुन्हा जोमानं चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाली. पण पुन्हा शूटिंग दरम्यान कंगना जखमी झाली आहे.

मणिकर्णिकाचं शूटिंग सध्या जोधपूरमध्ये सुरू आहे. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कंगना घोडेस्वारी करताना जखमी झाली. तिच्या पायाला दुखापत झाली आहे. जोधपूरमधील एका किल्ल्यात सिनेमाचे चित्रीकरण सुरू होते. कंगनाला भिंतीवरून घोड्यावर उडी मारायची होती. पण घोड्यावर उडी मारताना तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. त्यानंतर कंगनाला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. उपचारानंतर तिला डिस्चार्ज मिळाला. पण सध्या तिच्या पायााला प्लॅस्टर केल्यामुळे ती व्हीलचेअरवर आहे. डॉक्टरांनी एक आठवड्याचा आराम करण्याचा सल्ला कंगनाला दिला आहे. कंगना मुंबईत दाखल झाली असून काही दिवस ती शूटिंगमधून ब्रेक घेणार आहे.

७५ कोटी बजेट असलेला 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झासी' चित्रपटाचे दिग्दर्शन क्रिश करत आहेत. चित्रपटात कंगना झाशीच्या राणीची व्यक्तिरेखा साकारत आहे. २७ एप्रिल २൦१८ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा

कंगना आणि हृतिकमध्ये रणबीरसुद्धा!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा