कंगना आणि हृतिकमध्ये रणबीरसुद्धा!


SHARE

हृतिक रोशन आणि कंगना रणौत यांच्या वादात आता आणखी एक नाव समोर येत आहे. हे नाव ऐकून तुमच्या भुवया नक्कीच उंचावतील. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नाही, तर चॉकलेट बॉय रणबीर कपूर आहे. फक्त रणबीरच नाही, तर यात दीपिकाचं देखील नाव आलं आहे. कंगना आणि हृतिकमध्ये ई-मेलद्वारे झालेले संवाद आता जगासमोर येत आहेत. 'स्पॉटबॉय'नं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार कंगनानं हृतिकला केलेल्या मेलमध्ये रणबीरचा उल्लेख आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं रूप मिळालं आहे.

ई-मेलमध्ये कंगनानं हे स्विकारलं आहे की, तिनं रणबीरकडे स्वत:बरोबर फिजिकल रिलेशनशिप ठेवण्याची मागणी केलेली. पण रणबीरला सिरियस रिलेशनशिप हवी होती.


'क्वीन' चित्रपटानंतर रणबीर भाव द्यायला लागला!

ई-मेलमध्ये कंगनानं हे देखील म्हटलं आहे की, क्वीन चित्रपटाआधी रणबीरनं कधीच मला भाव दिला नव्हता. पण, त्यानं विकास बहलचे प्रॉडक्शन 'फँटम' हाऊसमध्ये 'क्वीन'चं फुटेज पाहिलं, तेव्हा त्यानं मला बीबीएमवर संपर्क केला. व्हिडिओ आणि इतर स्टारच्या फंकी लिंक त्यानं शेअर केल्या.


ई-मेलमध्ये काय म्हणते कंगना?

'ग्वाल्हेरमध्ये 'रिव्हॉल्वर रानी'चं चित्रीकरण सुरू होतं. तेव्हा रणबीरनं मला थेट संपर्क केला होता. तेव्हा मी रणबीरला म्हटलं की, मी कोणाबरोबर तरी रिलेशनशिपमध्ये आहे. तू माझ्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये आला, तेव्हापासून आमच्यात टेन्शन सुरू आहे. मी खूप टेन्शनमध्ये असते. मी तुझे नाव घेतले नाही. त्यानंतर माझा आणि रणबीरचा संपर्क नव्हता. पण मी न्यूयॉर्कला गेले होते, तेव्हा त्याचा मेसेज आला होता. न्यूयॉर्क तुला आवडलं का? असं रणबीरनं मला विचारलं. तेव्हा मी त्याला विचारलं की, तुला माझ्याशी शारिरीक जवळीक साधण्याची इच्छा आहे का? यावर तो थोडा घाबरला आणि म्हणाला की, आपल्यात सिरियस रिलेशनशिप ठेवता येणार नाही का? त्याचं उत्तर मिळताच मी म्हणाले की, मी एका व्यक्तीच्या प्रेमात आहे. मी त्याला दुखवू शकत नाही.

एवढंच नाही, तर कंगनानं दीपिकाच्या नावाचा देखील उल्लेख केला आहे. दीपिकाच्या वागण्याला 'अर्थहीन' म्हणत 'तिला तिच्या चुकीची जाणीव होईल', असं ई-मेलमध्ये म्हटल्याचा दावा करण्यात आला आहे.हेही वाचा

हृतिकनं तोडली चुप्पी, कंगनाला दिलं तीन पानी उत्तर!


संबंधित विषय
ताज्या बातम्या