Advertisement

अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतीचं निधन, अंत्यदर्शनासाठी अनेक सेलिब्रिटी हजर

अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती आणि चित्रपट निर्माते राज कौशल यांचे बुधवारी वयाच्या ४९व्या वर्षी निधन झालं.

अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतीचं निधन, अंत्यदर्शनासाठी अनेक सेलिब्रिटी हजर
SHARES

अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती आणि चित्रपट निर्माते राज कौशल यांचे बुधवारी वयाच्या ४९व्या वर्षी निधन झालं. पहाटे साडेचार वाजता राज यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक कलाकार हजर होते. रोहित रॉय आणि त्याची पत्नी मानसी जोशी रॉय, रॉनित रॉय, सिमरन सोनी, आशिष चौधरी असे अनेक कलाकार हजर होते.

२७ जूनला राज आणि मंदिरा यांनी त्यांच्या मित्र परिवारासोबत पार्टी एन्जॉय केली होती. त्यानंतर राज यांच्या निधानाची अचानक बातमी आल्यानं सर्वानाच मोठा धक्का बसला.

राज यांनी अभिनेता म्हणून करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी आपल्या कारकीर्दीत 'प्यार में कभी कभी', 'शादी का लड्डू' आणि 'अँथनी कौन है' सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. मंदिरा आणि राज यांचं १४ फेब्रुवारी १९९९ रोजी लग्न झालं होतं. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

गेल्या वर्षी राज आणि मंदिरा यांनी मुलगी ताराला दत्तक घेतलं होतं. मंदिरा आणि राज यांची पहिली भेट १९९६ मध्ये मुकुल आनंद यांच्या घरी झाली होती. मंदिरा तिथं ऑडिशनसाठी गेली होती आणि राज हे मुकुल आनंदचे सहाय्यक म्हणून काम करत होते. येथूनच दोघांचं प्रेम सुरू झालं.

राज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना रोहित रॉयनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिलं की, ' राज, माझा मित्र, माझा भाऊ... तू जिथे जायचा तिथे आनंद पसरवायचा. आम्ही सर्वजण तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि दुर्दैवानं पुढील आठवडा पुढील आठवडा म्हणत म्हणत आपली भेट होऊ शकली नाही. गुड बाय न म्हणतात तू निघून गेलास. कसं व्यक्त व्हावं हेच कळत नाहीये,' अशा शब्दांत रोहितनं दुःख व्यक्त केलं आहे.



हेही वाचा

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील नट्टू काकांना कॅन्सर

जालियनवाला हत्याकांडवर आधारीत चित्रपटाची घोषणा, करण जोहरची निर्मिती

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा