Advertisement

शाहरूखच्या 'डॉन ३'मध्ये प्रियंकाच्या जागी दीपिकाची वर्णी?


शाहरूखच्या 'डॉन ३'मध्ये प्रियंकाच्या जागी दीपिकाची वर्णी?
SHARES

किंग खानच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. शाहरूखच्या 'डॉन ३' चित्रपटाची शूटिंग लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी निर्माता रितेश सिधवानी यांनी 'डॉन ३' संदर्भात घोषणा केली होती. त्यानुसार रितेश कामाला लागले आहेत. अर्थात 'डॉन ३' मध्ये शाहरूख खान मुख्य भूमिकेत असणार आहे. आता चर्चा अशी आहे की, चित्रपटात प्रियंकाच्या जागी दीपिका पदुकोण झळकणार आहे. चित्रपटात कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागणार या संदर्भात अजून कुठलीच अधिकृत घोषणा केली नाही. पण दीपिकाच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

डॉनच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात प्रियंका चोप्रानं मुख्य भूमिका पार पाडली होती. पण सध्या प्रियंका चोप्रा हॉलिवूडमध्ये व्यस्त आहे. प्रियंका 'क्वांटिको'च्या थर्ड सिजनचं शूटिंग करत आहे. त्यामुळे 'डॉन ३'साठी तिच्या डेट्स मिळणं तसं कठिणच आहे. त्यामुळे 'डॉन ३'मध्ये दीपिकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे.  

शाहरूख आणि दीपिका यांनी यापूर्वी एकत्र काम केलं आहे. 'ओम शांती ओम', 'चेन्नई एक्स्प्रेस' आणि 'हॅपी न्यू इयर' या चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं आहे. त्यामुळे या जोडीला पुन्हा एकदा पाहायला नक्कीच आवडेल.

निर्माता रितेश सिधवानी 'डॉन 3' बनवणार आहेत. पण यासाठी त्यांना एखादी चांगली स्क्रिप्ट हवी आहे. 'डॉन 3'ची चांगली स्क्रिप्ट हाती लागल्यास चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात होईल, अशी घोषणा त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान केली होती. 

2006 मध्ये डॉन आणि 2011 मध्ये डॉन 2 प्रदर्शित झाले होते. शाहरुख खाननं चित्रपटात डॉनची भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या कथेसोबतच त्यातील डायलॉग्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. चित्रपटातील डायलॉग्स आजही प्रेक्षकांना तोंडपाठ असावेत. रितेशचं म्हणणं होतं की, 'डॉन 3' चित्रपट बनवण्यास मी खूप उत्सुक आहे. पण आमच्याकडे चांगली स्क्रिप्ट नाही. चांगली स्क्रिप्ट हाती आली की 'डॉन 3' चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल.' फुकरे रिटर्न्स चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान रितेशनं 'डॉन 3' संदर्भात घोषणा केली होती.हेही वाचा

बॉलिवूड क्वीन कंगना रणौत पुन्हा जखमी


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा