Advertisement

प्रियंकाची व्यवहारीक चतुराई


प्रियंकाची व्यवहारीक चतुराई
SHARES

स्वत:च्या लग्नात कोट्यवधी रुपये खर्च करणं हे सेलिब्रिटींसाठी काही नवीन नाही. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च करत मोठ्या थाटात लग्न केलं आहे. आता त्यात आणखी एक नाव जोडलं गेलं आहे ते म्हणजे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग. १४ नोव्हेंबरला हे लव्हबर्ड्स लग्नाच्या बेडीत अडकतील.

यानंतर नंबर येणार आहे तो प्रियंका चोप्रा आणि निक जोनस या जोडप्याचा. मात्र बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ लग्नासाठी पैशांचा खर्च करण्याच्या बाबतीत इतर सेलिब्रिटींच्या तुलनेत चतुर निघाली. तिनं लग्न होण्यापूर्वीच लग्नातल्या फोटोंचे सारे हक्क एका आंतरराष्ट्रीय मासिकाला विकून त्यातून कोट्यवधी रुपये कमावले आहेत.

प्रियांका डिसेंबर महिन्यात अमेरिकन गायक निक जोनाससोबत विवाहबंधनात अडकणार आहे. या बहुप्रतिक्षित लग्नाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे. राजस्थानमधल्या आलिशान महालात पारंपरिक भारतीय पद्धतीनं हा विवाहसोहळा होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनाच या लग्नाचं कुतूहल आहे. मात्र लग्नापूर्वी प्रियांकानं व्यावहारिक करार करत आपल्या लग्नाच्या फोटोंचे हक्क मासिकाला विकले आहेत.

तिनं एका मासिकासोबत २.५ मिलिअन डॉलर म्हणजेच जवळपास १८ कोटी २६ लाखांचा करार केला असल्याचं समजत आहे. या करारानुसार प्रियांका-निकच्या लग्नातले खास फोटो केवळ या मासिकाकडे उपलब्ध असणार आहेत. या मासिकाकडे ते प्रसिद्ध करण्याचा हक्क असणार आहे. अर्थात प्रियांकासोबतच मासिकालाही या करारातून प्रचंड नफा मिळणार आहे. या फोटोंच्या हक्कासाठी अनेक मासिकांनी कोट्यवधींची बोली लावली होती. यापूर्वी अभिनेत्री सोनम कपूर हिनं आपल्या लग्नातील फोटोंचे हक्क ‘व्होग’ मासिकाला विकले होते.


हेही वाचा

रणवीरने कोणाला पाठवला सिक्रेट मेसेज?

अभिनेते डॅनींच्या मुलाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा