Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

रणवीरने कोणाला पाठवला सिक्रेट मेसेज?

आज जिथे रणवीरवर लाखो तरूणी फिदा आहेत तिथे त्याने स्वत: कोणाला बरं असा सिक्रेट मेसेज पाठवला असेल, असा प्रश्न मनात येणं साहजीकच आहे. त्याला भेटायची इच्छा अर्थातच अनेकजणींना असेल, पण जेव्हा रणवीरच स्वत:च एखादीला भेटायची इच्छा प्रकट करतो, तेव्हा?..

रणवीरने कोणाला पाठवला सिक्रेट मेसेज?
SHARES

आज केवळ बॅालीवूडकरांनाच नव्हे, तर जगभरातील तमाम सिनेप्रेमींना रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाचे वेध लागले आहेत. सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचवणाऱ्या या बहुप्रतिक्षीत डेस्टिनेशन वेडींगसाठी इटलीला रवाना होण्यापूर्वी रणवीरने एका खास व्यक्तीला व्डिडीओ मेसेज पाठवला आहे. कोण आहे ही व्यक्ती‌?
गुलाबाची कळी

आज जिथे रणवीरवर लाखो तरूणी फिदा आहेत तिथे त्याने स्वत: कोणाला बरं असा सिक्रेट मेसेज पाठवला असेल, असा प्रश्न मनात येणं साहजीकच आहे. त्याला भेटायची इच्छा अर्थातच अनेकजणींना असेल, पण जेव्हा रणवीरच स्वत:च एखादीला भेटायची इच्छा प्रकट करतो, तेव्हा?..  ‘गुलाबाची कळी’ अभिनेत्री तेजस्विनी पंडित रणवीरची खूप मोठी चाहती आहे. या गुलाबाच्या कळीलाच रणवीरने खास मेसेज पाठवला असून, भेटण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.


तेजस्विनीला भेटायची इच्छा

रणवीर मागील काही दिवसांपासून 'सिम्बा' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र होता. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ जाधवही एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. दोघांची आता चांगलीच गट्टी जमली असून, या सेटवर सिद्धार्थने रणवीरसोबत आपला वाढदिवसही साजरा केला होता. सिद्धार्थ हा तेजस्विनीचाही खूप चांगला मित्र आहे आणि ती रणवीरची चाहती असल्याचं सिध्दार्थला ठाऊक आहे. म्हणूनच 'सिम्बा'च्या सेटवरून सिध्दार्थने त्याची ‘बंड्या’ अर्थातच तेजस्विनीसाठी रणवीरचा एक खास मेसेज रेकॉर्ड करून तिला दिवाळीचं सरप्राइज दिलं. या मेसेजमध्ये रणवीरने चक्क तिला भेटायची इच्छा व्यक्त केली.


नि:शब्द झाली

हा मेसेज पाहून तेजस्विनी भारावून गेली आहे. तिच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना ती म्हणते की, हा मेसेज पाहून मी नि:शब्द झाली आहे. रणवीरची मी खूप काळापासून चाहती आहे. आणि ही गोष्ट सिद्धूला चांगलीच माहीत होती. तो सध्या 'सिम्बा'च्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. तिथे अनपेक्षितपणे त्याने मला दिवाळीला खुद्द रणवीरचा माझ्यासाठीचा मेसेज रेकॉर्ड करून पाठवल्याचंही तेजस्विनी म्हणाली. 


मराठी सिनेमाच्या गप्पा

'सिम्बा'शी निगडीत असलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, सेटवर बऱ्याचदा सिध्दार्थ आणि रणवीरच्या मराठी सिनेसृष्टी आणि सिनेमाविषयीच्या गप्पा रंगतात. या गप्पांच्या ओघात सिध्दार्थने रणवीरला तेजस्विनीविषयी सांगितलं. रणवीरने तेजस्विनीविषयी लगेच गुगल करून माहिती काढल्यावर, त्याला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिंधुताई सकपाळ चित्रपटाची नायिका तेजस्विनी होती, हे कळलं. मग त्याने सिध्दार्थकडून तेजस्विनीला व्हिडीओ पाठवून तिला भेटायची इच्छा व्यक्त केली.हेही वाचा- 

मनसेच्या इशाऱ्यानंतर ...घाणेकरचे ४ शो लावण्यास मल्टिप्लेक्सचालक तयार

झीरोच्या अडचणीत वाढ, चित्रपटाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा