Advertisement

झीरोच्या अडचणीत वाढ, चित्रपटाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल

या चित्रपटात शाहरूख खानला किरपान धारण केलेलं दाखवण्यात आलं आहे. शीख धर्मामध्ये किरपानला अत्यंत पवित्र मानलं जात आणि त्याला विशेष महत्त्वही आहे. असं असताना चित्रपटात टिंगळटवाळी करताना शाहरूखला किरपान धारण केलेलं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळं शीख धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत.

झीरोच्या अडचणीत वाढ, चित्रपटाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल
SHARES

बाॅलिवूड स्टार शाहरूख खानच्या झीरो चित्रपटाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. या चित्रपटातील किरपान धारण केलेलं दृश्य जोपर्यंत काढलं जात नाही तोपर्यंत चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका देशभरातील शीख समुदायानं घेतली असून यासंदर्भात पोलिस ठाण्यात तक्रारीही दाखल झाल्या आहेत. असं असताना आता या चित्रपटाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेद्वारे सिनेमातील वादग्रस्त दृश्य काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.

शीख धर्मियांच्या भावना दुखावल्या

२१ डिसेंबर रोजी झीरो चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या ट्रेलरची सध्या चांगलीच चलती आहे. देशविदेशात ट्रेलरला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे मात्र हा चित्रपटच आता वादात अडकला असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग खडतर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या चित्रपटात शाहरूख खानला किरपान धारण केलेलं दाखवण्यात आलं आहे. शीख धर्मामध्ये किरपानला अत्यंत पवित्र मानलं जात आणि त्याला विशेष महत्त्वही आहे. असं असताना चित्रपटात टिंगळटवाळी करताना शाहरूखला किरपान धारण केलेलं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळं शीख धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत.

पोलिसांना पत्र

मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी नुकतीच मुंबई पोलिसांना पत्र लिहित या चित्रपटाविरोधात तक्रार दाखल केली आहे. तर आता पेशानं वकिल असलेल्या अमृतपाल सिंग खालसा यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. इतकंच नव्हे तर दिल्लीत अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंग सिर्सा यांनी शाहरूख खान याच्याविरोधात गुन्हाही दाखल केला आहे. त्यामुळं एकूणच या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे.

हेही वाचा- 

शाहरूखचा 'झीरो' वादात; किरपानचं दृश्य हटवण्याची चरणसिंग सप्रांची मागणी

२८ वर्षांनी पुन्हा मराठीकडे वळले बप्पीदा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा