Advertisement

राजकुमार राव आणि जान्हवी कपूरच्या 'रुही' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता राजकुमार राव आणि जान्हवी कपूर स्टारर हॉरर कॉमेडी 'रुही' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

राजकुमार राव आणि जान्हवी कपूरच्या 'रुही' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
SHARES

अभिनेता राजकुमार राव आणि जान्हवी कपूर स्टारर हॉरर कॉमेडी 'रुही' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला. हा चित्रपट ११ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. स्वत: राजकुमार रावनं या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

चित्रपटाचा ट्रेलर शेअर करताना त्याने लिहिले, 'रुही'चा ट्रेलर स्वत:च्या जोखमीवर पहा, कारण यावेळी 'मर्द को ज्यादा दर्द होगा', असं कॅप्शन राजकुमारनं दिलं आहे.

हार्दिक मेहता दिग्दर्शित या चित्रपटात वरुण शर्मासुद्धा मुख्य भूमिकेत आहे. तसंच पंकज त्रिपाठी आणि अपारशक्ती खुराना देखील चित्रपटात दिसणार आहेत. ट्रेलरच्या सुरुवातीला राजकुमार आणि वरुण शर्मा जान्हवीला किडनॅप करताना दिसत आहेत. त्यानंतर तिला ते जंगलात घेऊन जातात.

सुरुवातीला या चित्रपटाचं नाव ‘रुही-आफजा’ असं ठेवण्यात आलं होतं. मात्र या चित्रपटाच्या नावात बदल करण्यात आला आहे. आता ‘रुही’ असं या चित्रपटाचं नाव ठेवण्यात आलं आहे.

यापूर्वी सोमवारी चित्रपटाचे टीझर पोस्टर शेअर करताना जान्हवीनं कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, “भूतिया शादी में आपका स्वागत है.” चित्रपटाची कथा मृगदीपसिंग लांबा यांनी लिहिली आहे. मॅडॉक फिल्म्स आणि जिओ स्टुडिओनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे.हेही वाचा

महेश मांजरेकर यांच्या मुलानं डिजिटल क्षेत्रात ठेवलं पाऊल

'Ek Villian 2' या दिवशी प्रदर्शित होणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा