Advertisement

'Ek Villian 2' या दिवशी प्रदर्शित होणार

चित्रपटाचा पहिला भाग २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्यात सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होते.

'Ek Villian 2' या दिवशी प्रदर्शित होणार
SHARES

आता सिनेमा हॉलमध्ये १०० टक्के क्षमतेनं प्रेक्षक हजर राहू शकतात. त्यामुळे बहुतेक बॉलिवूड चित्रपट निर्माते त्यांच्या चित्रपटांच्या नव्या तारखांची घोषणा करण्याकडे पाहत आहेत. लिगरच्या निर्मात्यांनी घोषित केलं की ९ सप्टेंबर २०२१ रोजी हा चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये पाहता येईल.

चित्रपटात विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत असून करण जोहर निर्मित करत आहे. यानंतर आणखी एक चित्रपटासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. एक व्हिलन २ चा सीक्वेल ११ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी ही घोषणा करण्यात आली.

चित्रपटात दिशा पटानी, तारा सुतारिया आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. पूर्वी आदित्य रॉय कपूर हादेखील या चित्रपटाचा एक भाग होता. पण तारखांमुळे तो बाहेर पडला. एक विलियन २ चे दिग्दर्शन मोहित सूरी करत आहेत. याची निर्मिती एकता कपूर आणि भूषण कुमार यांनी केली आहे.

चित्रपटाचा पहिला भाग २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्यात सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होते.

या सिक्वेलमध्ये आदित्य रॉय कपूरच्या भूमिकेत कोण पाऊल ठेवणार आहे हे निर्मात्यांनी खुलासा केला नाही. मात्र, लवकरच शूटिंगचे वेळापत्रक सुरू होण्याची अपेक्षा आहे. मलंगच्या यशानंतर मोहित सूरी आणि दिशा पटानी हे दुसऱ्यांदा एकत्र काम करणार आहेत.



हेही वाचा

जल्लीकट्टू ऑस्कर स्पर्धेतून बाहेर

अनीता हसनंदानीनं दिला मुलाला जन्म, नवऱ्यानं पोस्ट करत दिली गोड न्यूज

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा