Advertisement

जल्लीकट्टू ऑस्कर स्पर्धेतून बाहेर

3 व्या अॅकडमी अवार्डच्या स्पर्धेसाठी भारताकडून पाठवण्यात आलेला मल्याळम चित्रपट 'जल्लीकट्‌टू' स्पर्धेतून बाद झाला आहे.

जल्लीकट्टू ऑस्कर स्पर्धेतून बाहेर
SHARES

93 व्या अॅकडमी अवार्डच्या स्पर्धेसाठी भारताकडून पाठवण्यात आलेला मल्याळम चित्रपट 'जल्लीकट्‌टू' स्पर्धेतून बाद झाला आहे. अॅकडमीकडून स्पर्धेत कायम राहिलेल्या चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली आहे. यात करीश्मा देव दुबेचा लाइव्ह एक्श्न लघुपट 'बिट्‌टू'नं आपले स्थान कायम ठेवले आहे.

फायनल नॉमिनेशनची घोषणा १५ मार्चला होत असून अवार्ड समारंभ २५ एप्रिल रोजी होणार आहे. स्पर्धेसाठी १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२० मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटामधून निवड होणार होती. ऑस्करमध्ये ९३ देशातील चित्रपटांमध्ये स्पर्धा आहे.

करीश्मा देव दुबेच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या 'बिट्‌टू'मध्ये दोन शाळकरी मुलांच्या मैत्रीची गोष्ट आहे. हा चित्रपट जगातील १८ देशामधील फिल्म फेस्टीव्हलमध्ये दाखवण्यात आला आहे. दरम्यान, तामिळ दिग्दर्शक लिजो जोस पेलिसरीची मल्याळम चित्रपट 'जल्लीकट्‌टू' भारताकडून पाठवण्यात आलेला अधिकृत चित्रपट होता. पण, या चित्रपटाला आपले स्थान टिकवता आले नाही.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा