Advertisement

ईदच्या मुहर्तावर चित्रपट गृहांमध्ये झळकणार 'राधे'

केवळ सलमान खानचा चित्रपटच कोरोनामुळे चित्रपटगृहांना झालेले आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी मदत करू शकतो, असा विश्वास चित्रपटगृह मालकांना आहे.

ईदच्या मुहर्तावर चित्रपट गृहांमध्ये झळकणार 'राधे'
SHARES

अभिनेता सलमान खानला त्याचा आगामी राधे हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित करण्यासाठी देशभरातील थिएटर एक्झिबिटर असोसिएशननं विनंती केली होती.

केवळ सलमान खानचा चित्रपटच कोरोनामुळे चित्रपटगृहांना झालेले आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी मदत करू शकतो, असा विश्वास चित्रपटगृह मालकांना आहे.

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन सलमाननं लिहिलं की, 'सर्व चित्रपटगृह मालकांना प्रतिसाद देण्यासाठी मला इतका वेळ लागल्या त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. या काळातील हा एक मोठा निर्णय आहे. थिएटर मालक आणि चित्रपट वितरक सध्या ज्या आर्थिक समस्येचा सामना करत आहेत ती परिस्थिती मी समजू शकतो. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी मी राधे हा चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्या बदल्यात त्यांनी माझ्या चाहत्यांना चांगल्या सुविधा आणि अत्याधुनिक सुरक्षितता द्यावी ही विनंती. 2021 मध्ये ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट सर्वांच्या भेटीला येईल, इंशाल्लाह. यावर्षी ईदला थिएटरमध्ये राधेचा आनंद घ्या,' अशा आशयाची पोस्ट सलमाननं शेअर केली आहे.



सलमानच्या या चित्रपटाला ऑनलाईन प्रदर्शित करण्यासाठी तब्बल 250 कोटींची ऑफर मिळाली होती. परंतु सलमाननं ओटीटीला साफ नकार दिला आहे.

'राधे' या चित्रपटाची निर्मिती सलमान खान, सोहेल खान आणि अतुल अग्निहोत्री यांचे बॅनर सलमान खान फिल्म्स, सोहेल खान प्रॉडक्शन्स आणि रील लाइफ प्रॉडक्शन अंतर्गत करण्यात आली आहे. ‘राधे’ या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभुदेवा यांनी केलं आहे. यामध्ये सलमान खानसह दिशा पाटनी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय जॅकी श्रॉफ, जरीना वहाब आणि रणदीप हुडा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका यात आहेत.



हेही वाचा

'तांडव' वेब सिरिजमध्ये बदल होणार, दिग्दर्शकानं केलं ट्विट

अमिताभ म्हणतात, "आता थकलो आहे आणि निवृत्त झालो आहे"

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा