'लव आज कल २'चा ट्रेलर प्रदर्शित, कार्तिक-साराची सिझलिंग केमिस्ट्री

कार्तिक आर्यन (Love Aaj Kal) और सारा अली खान स्टारर 'लव आज कल'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. २००९ मध्ये सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणच्या 'लव आज कल'चा हा सिक्वेल आहे.

SHARE

इम्तियाज अली दिग्दर्शित 'लव आज कल २' (Love Aaj Kal) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि सारा अली खान !! (Sara Ali Khan) ही बहुचर्चित जोडी प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून तुम्हाला सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणची आठवण येईल.

प्रेमाचा त्रिकोण?

कार्तिक साराची सिझलिंग केमिस्ट्री या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. ही कथा वीर आणि जुईची आहे. सारा या चित्रपटात एका बिनधास्त मुलीच्या भूमिकेत तर कार्तिक एका थोड्याशा लाजऱ्या आणि गोंधळलेल्या मुलाच्या भूमिकेत दिसत आहे. पण या व्यतिरिक्त या चित्रपटात आणखी एक अभिनेत्री दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळणार आहे, असं चित्र दिसतंय

दोघांच्या रिलेशनची चर्चा

करण जोहरच्या चॅट शोमध्ये सारानं कार्तिकला डेट करायची इच्छा बोलून दाखवली होती. त्यानंतर एका कार्यक्रमात अभिनेता रणवीर सिंहनं या दोघांची भेट घडवून आणली होती. त्यानंतर या जोडीची लोकप्रियता लक्षात घेता इम्तियाज अली यांनी ‘लव आज कल 2’साठी दोघांना साइन केलं. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढल्याच्या देखील चर्चा होत्या. पण नुकतंच त्यांचं ब्रेकअप झाल्याचंही बोललं जातंय.

जबराट पोस्टर

गुरुवारीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. पोस्टरमध्ये दोघांची जोडी जबराट दिसत आहे. कार्तिक आर्यन या पोस्टरमध्ये झोपलेला दिसत आहे. त्याच्यासोबत सारा देखील आहे. एकमेकांच्या प्रेमात आकुंठ बुडालेले पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहेत. सारा आणि कार्तिकनं ‘लव आज कल’ या चित्रपटाचं पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केलं होतं. गेले वर्षभर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघांनीही अप्रत्यक्षपणे अनेकदा आपले रिलेशनशिप स्टेटस मान्य देखील केलं होतं. त्यामुळे या चित्रपटाबाबतची चाहत्यांमधील उत्सुकता आणखी वाढली.

कधी होणार प्रदर्शित?

१४ फेब्रुवारी म्हणजेच ‘व्हेलेंटाईन डे’च्या दिवशी सारा आणि कार्तिक हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सारा आणि कार्तिक व्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. रोमँटिक ड्रामा असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन इम्तियाज अली यानं केलं आहे.

२००९ मध्ये सैफ अली खान आणि दीपिका पादुकोणनं ‘लव आज कल’च्या पहिल्या भागात काम केलं होतं. ‘लव आज कल 2’ हा चित्रपट सिक्वेल आहे. विशेष म्हणजे आता ‘लव्ह आज कल’च्या रिमेकमध्ये सैफची लेक सारा अली खान पाहायला मिळणार आहे.


हेही वाचा

'तान्हाजी'नं पार केला १०० कोटींचा डोंगर, आतापर्यंत केली 'इतकी' कमाई

सलमानची गुड न्यूज ऐकून चाहत्यांना बसेल 'किक'


संबंधित विषय
ताज्या बातम्या