Advertisement

बघा असा आहे, अमिताभ, शाहरुखचा 'बदला अनप्लग्ड'!

हे 'बदला अनप्लग्ड' नेमकं काय आहे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडणं सहाजिक आहे. या शुक्रवारी अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला 'बदला' हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या क्राइम थ्रीलर सिनेमाची निर्मिती शाहरुख खाननं केली आहे. प्रदर्शनापूर्वीच या सिनेमातील मुख्य मुद्दे प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी या दोघांनी जी चर्चा केली ते म्हणजेच 'बदला अनप्लग्ड'.

बघा असा आहे, अमिताभ, शाहरुखचा 'बदला अनप्लग्ड'!
SHARES

बॅालीवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन आणि बादशाह अर्थात शाहरुख खान आजवर फार कमी वेळा स्क्रिनवर एकत्र दिसले आहेत. परंतु ते जेव्हा केव्हा एकत्र येतात, तेव्हा सर्वांचंच लक्ष वेधून घेतात. आता 'बदला अनप्लग्ड'च्या निमित्तानं शहेनशाह आणि बादशाह पुन्हा एकत्र आले आहेत.


काय आहे? 'बदला अनप्लग्ड'

हे 'बदला अनप्लग्ड' नेमकं काय आहे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडणं सहाजिक आहे. या शुक्रवारी अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला 'बदला' हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या क्राइम थ्रीलर सिनेमाची निर्मिती शाहरुख खाननं केली आहे. प्रदर्शनापूर्वीच या सिनेमातील मुख्य मुद्दे प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी या दोघांनी जी चर्चा केली ते म्हणजेच 'बदला अनप्लग्ड'.

Watch the Episode 1 here: http://bit.ly/Unplugged_Episode1Badla

पहिला एपिसोड प्रदर्शित

'बदला अनप्लग्ड'चा पहिला एपिसोड प्रदर्शित करण्यात आला आहे. या एपिसोडमध्ये अमिताभ आणि शाहरुख यांच्यात चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतं. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी हिंदी सिनेसृष्टीतील दोन दिग्गजांच्या सहाय्यानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्याची ही चांगली कल्पना असल्याचं मानलं जात आहे. या सिनेमात अमिताभसोबत तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहे, पण 'बदला अनप्लग्ड'च्या माध्यमातून 'बदला'ला शाहरुखच्या स्टारडमचीही जोड देण्यात आली आहे.


लक्षवेधी टीझर

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'बदला'च्या टीझरनं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असतानाच 'बदला अनप्लग्ड' या सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढवण्यास मदत करणार असल्याचं संकेत मिळत आहेत. सिनेमाच्या निमित्तानं नसले तरी त्यावर आधारित चर्चेच्या माध्यमातून दोन दिग्गज कलाकार एकत्र आलेलं पाहणं त्यांच्या चाहत्यांसाठी आनंददायी बाब आहे.

अमिताभ आणि शाहरुख यांच्यावर चित्रीत झालेला पहिला एपिसोड 'बदला'च्या प्राॅडक्शन हाऊसच्या वतीनं रिलीज करण्यात आला आहे. पहिल्या भागाला लाभलेल्या प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर लवकरच दुसरा एपिसोडही रिलीज करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

८ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाच्या निमित्तानं अमिताभ-शाहरुख यांच्या थट्टा-मस्करीचा व्हिडिओही 'बदला अनप्लग्ड'मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या सिनेमात एका स्त्रीची कथा असून, हत्या आणि ब्लॅकमेलिंकमधील सत्य उलगडणारी आहे. सुजॅाय घोष यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.



हेही वाचा- 

कॉलेजमधील गंमतीजमती सांगणार 'आम्ही बेफिकर'

'हा' आहे भन्साळींचा नवा चेहरा!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा