Advertisement

हा आहे भन्साळींचा नवा चेहरा!

संजय लीला भन्साळी पुन्हा एकदा आपल्या होम प्रॅाडक्शनमध्ये बनणाऱ्या सिनेमात नवा चेहरा लाँच करणार आहेत. भन्साळी प्रॅाडक्शन्स प्रा. लि.च्या वतीने ही अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

हा आहे भन्साळींचा नवा चेहरा!
SHARES

सिनेनिर्मितीपासून दिग्दर्शनापर्यंत आणि लेखनापासून संगीत दिग्दर्शनापर्यंत सर्वच आघाड्यांवर लक्षवेधी कामगिरी करत रसिकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या संजय लीला भन्साळी यांनी आजवर बऱ्याच नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. आता ते आणखी एक नवा चेहरा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या नवीन चेहऱ्याचं नाव आहे मीझान.


स्टार किड्सना लाँच

भन्साळींनी 'सांवरीया' या सिनेमाद्वारे रणबीर कपूर आणि सोनम कपूर या दोन स्टार किड्सना बाॅलीवूडमध्ये लाँच केलं होतं. आज दोघेही हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांपैकी एक आहेत. आता भन्साळी पुन्हा एकदा आपल्या होम प्रॅाडक्शनमध्ये बनणाऱ्या सिनेमात नवा चेहरा लाँच करणार आहेत. भन्साळी प्रॅाडक्शन्स प्रा. लि.च्या वतीने ही अधिकृत माहिती देण्यात आली आहे.


नवा चेहरा

यावर्षी भन्साळींच्या प्रॅाडक्शन हाऊसमध्ये तयार होणाऱ्या प्रोजेक्टसमध्ये मीझान हा नवा चेहरा झळकणार आहे. मीझानच्या म्हणण्यानुसार त्यानं बालपणापासून कधीच अॅक्टर बनण्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं. हे स्वप्न पाहायला त्याला भन्साळींनी शिकवलं आहे. मीझानला अॅक्टर बनवावं हे भन्साळींचं केवळ स्वप्न नसून, तो एक उत्तम अभिनेता बनू शकतो हा त्यांना ठाम विश्वास वाटतो. याच विश्वासाच्या बळावर ते मीझानला लॉंच करण्याची तयारी करत आहेत.




तीन सिनेमांसाठी साईन

भन्साळी प्रॅाडक्शनच्या सीईओ प्रेरणा सिंह यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जेव्हा पहिल्यांदा मीझानला आॅफीसमध्ये पाहिलं तेव्हाच आपण भविष्यातील एका स्टारला पाहत असल्याचा भास त्यांना झाला. एक व्हर्सटाईल फेस पाहून त्याही दंग झाल्या. आजच्या इंडस्ट्रीतील एक्सायटिंग फेजमध्ये मीझानचं भवितव्य उज्ज्वल असल्याचं त्या मानतात. याच कारणामुळं भन्साळी प्रॅाडक्शननं त्याला एक नव्हे, तर चक्क तीन सिनेमांसाठी साईन केलं आहे. आता भन्साळींसारख्या मेकरचा हात ज्याच्या डोक्यावर आहे त्याला स्टार बनायला कितीसा वेळ लागणार.



हेही वाचा -

डोक्याला शॉट'च्या प्रीमियर शोला दिग्गजांची मांदियाळी

ऋतिकच्या खांद्यावरील गमछाचं रहस्य काय?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा