Advertisement

डोक्याला शॉट'च्या प्रीमियर शोला दिग्गजांची मांदियाळी

'डोक्याला शॅाट' या मराठी सिनेमाचा प्रीमियर शो मुंबईत मोठ्या दिमाखात पार पडला. चार मित्रांची धमाल गोष्ट सांगणाऱ्या या सिनेमाचं दिग्दर्शन शिवकुमार पार्थसारथी यांनी केलं आहे. या सिनेमाच्या प्रीमियर शो साठी मराठी सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांनी हजेरी लावली.

डोक्याला शॉट'च्या प्रीमियर शोला दिग्गजांची मांदियाळी
SHARES

गत शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या निर्माते उत्तुंग ठाकूर यांच्या 'डोक्याला शॅाट' या मराठी सिनेमाचा प्रीमियर शो मुंबईत मोठ्या दिमाखात पार पडला. चार मित्रांची धमाल गोष्ट सांगणाऱ्या या सिनेमाचं दिग्दर्शन शिवकुमार पार्थसारथी यांनी केलं आहे. या सिनेमाच्या प्रीमियर शो साठी मराठी सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांनी हजेरी लावली.


अमित राज


शुभांगी गोखले


राधिका हर्षे


यात अमोल गुप्ते, रवी जाधव, शुभांगी गोखले, सुयश टिळक, ऋतुजा बागवे, आरोह वेलणकर, शिवराज वायचळ, राधिका हर्षे, स्तवन शिंदे, समीर चौगुले, बी युनिक ग्रुप यांच्यासोबत 'डोक्याला शॉट' चित्रपटातील प्राजक्ता माळी, रोहित हळदीकर, ओमकार गोवर्धन, गणेश पंडित संगीतकार अमितराज, श्रीकांत, अनिता आदी कलाकारही उपस्थित होते.


रवी जाधवऋतुजा बागवे


'डोक्याला शॉट' चित्रपट पाहिल्यावर सगळ्या मान्यवरांनी 'आम्हाला हा शॉट अफलातून वाटला', अशा आशयाची प्रतिक्रिया दिली. "प्रेक्षकांनी देखील या धमाल विनोदी 'शॉट'चा चित्रपटगृहात जाऊन आनंद घ्यावा आणि खळखळून हसावं" असं आवाहन देखील यावेळी या कलाकारांनी केलं.हेही वाचा -

रेल्वे प्रवाशांसाठी विविध सुविधांचा पाऊस; सरकते जिने, लिफ्टची संख्या वाढणार

मंगळवारी महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संपावरसंबंधित विषय