Advertisement

ऋतिकच्या खांद्यावरील गमछाचं रहस्य काय?

'काबील' या सिनेमानंतर ऋतिक रोशनच्या चाहत्यांना आता त्याच्या 'सुपर ३०' या आगामी सिनेमाचे वेध लागले आहेत. या सिनेमात ऋतिक पुन्हा एकदा एक वेगळ्या ढंगाच्या भूमिकेत प्रेक्षकांना भेटणार आहे.

ऋतिकच्या खांद्यावरील गमछाचं रहस्य काय?
SHARES

'काबील' या सिनेमानंतर ऋतिक रोशनच्या चाहत्यांना आता त्याच्या 'सुपर ३०' या आगामी सिनेमाचे वेध लागले आहेत. या सिनेमात ऋतिक पुन्हा एकदा एक वेगळ्या ढंगाच्या भूमिकेत प्रेक्षकांना भेटणार असून, त्याच्या खांद्यावर कायम एक लाल रंगाचा गमछा असेल. चला ऋतिकच्या या गमछाचं रहस्य काय आहे हे जाणून घेऊया.


प्रेक्षकांना आश्चर्यचकित करण्यासाठी

ऋतिकसारखे काही अभिनेते एखादी व्यक्तिरेखा साकारताना तिच्याशी इतके एकरूप होतात की त्यांना आजूबाजूचं भानच राहात नाही. मग त्यासाठी लागणाऱ्या बारीकसारीक गोष्टीही ते बारकाईने करतात. मागील बऱ्याच दिवसांपासून ऋतिक 'सुपर ३०'मधील आपल्या भूमिकेवर मेहनत घेत आहे. या भूमिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांना आश्चर्यचकित करण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या कामी ऋतिकला त्याच्या खांद्यावरील गमछा मदतीचं काम करत आहे.


बिहारी शिक्षकाची आठवण

'सुपर ३०'मधील ऋतिकचा लुक त्याच्या आजवरच्या व्यक्तिरेखांपेक्षा खूपच वेगळा आहे. या सिनेमात तो एका बिहारी व्यक्तीची भूमिका साकारत आहे. बिहारी लोकांच्या खांद्यावर कायम गमछा असतो. हा बिहारी मूळात एक शिक्षक आहे. पटणा येथे राहणारा हा शिक्षक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या ३० हुषार विद्यार्थ्यांना कमी पैशांमध्ये आयआयटीच्या प्रवेश परीक्षेसाठी तयार करण्याचं काम करत असतो. हा जरी शिक्षक असला तरी बिहारी असल्यानं त्याच्या खांद्यावर कायम गमछा असतो. त्यामुळे ऋतिक बऱ्याचदा कॅमेरा आॅफ असतानाही खांद्यावर गमछा ठेवूनच वावरतो. हा गमछा आपल्याला त्या बिहारी शिक्षकाची आठवण करून देतो असं त्याचं मत असल्याचं समजतं.


२६ जुलैला प्रदर्शित

याच कारणामुळे ऋतिक आणि गमछा यांचं या सिनेमाकरता का होईना पण एक अनोखं नातं जडलं आहे. या सिनेमात ऋतिकच्या जोडीला मृणाल ठाकूर, अमित साध आणि नंदीश संधू यांच्या भूमिका आहेत. ऋतिकचा हा महत्त्वाकांक्षी सिनेमा २६ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाकडून केवळ ऋतिकलाच नव्हे, तर त्याच्या चाहत्यांनाही खूप अपेक्षा आहेत.



हेही वाचा -

डोक्याला शॉट'च्या प्रीमियर शोला दिग्गजांची मांदियाळी

गिरगाव आणि जुहू चौपाटीला ‘क्लिन स्ट्रीट फूड हब’चा दर्जा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा