• शत्रुघ्नसिन्हांना अमिताभबरोबर काम करायचंय...
  • शत्रुघ्नसिन्हांना अमिताभबरोबर काम करायचंय...
SHARE

मुंबई - 'शॉट गन' म्हणून प्रसिद्ध असणारे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना पुन्हा एकदा रूपेरी पडदा खुणावू लागला आहे. रामगोपाल वर्मा यांचे दिग्दर्शन असलेल्या आणि 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रक्तचरित्र' चित्रपटामध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी काम केले होते. त्यानंतर गेली काही वर्षे ते राजकारणमध्येच व्यग्र आहेत. मात्र आता त्यांना पुन्हा चित्रपटात परतायचे असून, यावेळची आपली इनिंग आणखी जोरदार करायची आहे. त्यासाठीच अमिताभ बच्चन आणि आपणासाठी कुणीतरी चांगली पटकथा लिहावी, अशी इच्छा शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी हे दोन दिग्गज अभिनेते 'बॉम्बे टू गोवा', 'काला पत्थर', 'दोस्ताना', 'नसीब' यासारख्या चित्रपटांमधून एकत्र झळकले होते. सोनाक्षी सिन्हाची प्रमुख भूमिका असलेल्या 'अकिरा' चित्रपटामध्ये शत्रुघ्न सिन्हा सोनाक्षीच्या वडिलांची भूमिका साकारणार होते. मात्र या दोघांनी एकत्र यायचे असले तर तशीच तुल्यबळ भूमिका हवी, असा विचार झाल्याने ही भूमिका कालांतरानं अन्य कलावंतानं साकारली होती. गेल्या वर्षी अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या 'पीकू' आणि 'पिंक' या चित्रपटांमधील भूमिकांमध्ये शत्रुघ्नसिन्हा प्रचंड प्रभावीत झाले आहेत. 'आम्ही दोघे एकत्र आलो तर प्रेक्षकांसाठी ती पर्वणी असेल,' असेही मत सिन्हा यांनी व्यक्त केलं आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या