Advertisement

मुलांसाठी ३ कोटींची कार खरेदी केली नाही : सोनू सूद

अभिनेता सोनू सूदनं त्याचा मुलगा ईशानसाठी तीन कोटींची लग्झरी कार खरेदी केल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती.

मुलांसाठी ३ कोटींची कार खरेदी केली नाही : सोनू सूद
SHARES

रविवारी फादर्स डे साजरा झाला. या दिवसाचे औचित्य साधत अभिनेता सोनू सूदनं त्याचा मुलगा ईशानसाठी तीन कोटींची लग्झरी कार खरेदी केल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती. याचा एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मात्र आता सोनू सूदनं या वृत्ताचे खंडन केलंय. मुलगा ईशानसाठी कार खरेदी केली नसल्याचं सोनूनं स्पष्ट केलं आहे.

याविषयी सोनूनं सांगितलं की, 'यात कोणतही सत्य नाही. मी माझ्या मुलासाठी कोणतीच कार घेतलेली नाही. ती कार आमच्या घरी ट्रायलसाठी आली होती. आम्ही टेस्ट ड्राईव्हसाठी गेलो होतो. पण आम्ही कोणतीच कार खरेदी केली नाही.' यापुढे सोनू सूद पुढे म्हणाला, 'यात फादर्स डे चा अ‍ँगल कुठून आला ते माहित नाही मला. फादर्स डे च्या दिवशी मी माझ्या मुलाला गिफ्ट का देणार ? याउलट त्यांनी मला काही तरी गिफ्ट केले पाहिजे. शेवटी आज माझा दिवस आहे,' असे तो म्हणाला.

सोनू म्हणतो, 'हा गंमतीचा भाग वगळला तर माझी दोन्ही मुलं माझ्यासोबत संपूर्ण दिवस घालवतील तेच माझ्यासाठी फादर्स डेचं गिफ्ट असेल. कारण माझ्याकडे त्या दोघांसाठी खूप कमी वेळ असतो. आता ते दोघेही मोठे होत आहेत. त्यांचंही आता वेगळं जीवन सुरू झालं आहे. त्यामुळे सोबत एकत्र दिवस घालवला तरी ते लग्झरीपेक्षा काही कमी ठरणार नाही. जे मला हवंय ते मी कमवलंय.'

सोनूनं आपल्या चाहत्यांचेही आभार मानले आहेत. तो म्हणाला, 'या वृत्तावर ९० टक्क्यापेक्षा अधिक लोकांचे कमेंट्स हे माझ्या बाजूनं होते. गेल्या एक महिन्यापासून जी मला सकारात्मकता आणि प्रेम मिळतंय, त्यासाठी सर्वांचा मी आभारी आहे. हेच जीवनातील सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे. मग कुणीही माझ्या कामाप्रती लोकांच्या मनातील विचारांना बदलण्याचा प्रयत्न केला तरी माझे शुभचिंतक कधीच माझ्यावर शंका घेणार नाहीत.'संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा