Advertisement

अजय देवगणच्या ‘तानाजी’च्या शूटिंगचा शुभारंभ

रितीरिवाजाप्रमाणे पूजाअर्चा करून अजय आणि ओम यांनी ‘तानाजी’च्या चित्रीकरणाला प्रारंभ केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मिलेल्या हिंदवी स्वराज्यातील सिंह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शूरवीर तानाजी मालुसरे यांची कथा या सिनेमाद्वारे जगासमोर येणार आहे.

अजय देवगणच्या ‘तानाजी’च्या शूटिंगचा शुभारंभ
SHARES

आज बरेच मराठी दिग्दर्शक हिंदीच्या दिशेने वाटचाल करीत असून, महत्त्वाकांक्षी सिनेमांवर काम करीत आहेत. ‘लोकमान्य’सारखा सिनेमा बनवणारा मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊतही यात मागे नाही. ओमचं पहिलं हिंदी दिग्दर्शन असलेल्या ‘तानाजी : द अनसंग वॅारीयर’ या सिनेमाच्या चित्रीकरणाला मंगळवारपासून प्रारंभ करण्यात आला आहे. या सिनेमात अभिनेता अजय देवगण शीर्षक भूमिकेत म्हणजेच सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे.तानाजी मालुसरे यांची कथा

रितीरिवाजाप्रमाणे पूजाअर्चा करून अजय आणि ओम यांनी ‘तानाजी’च्या चित्रीकरणाला प्रारंभ केला आहे. यासोबतच त्यांनी या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखही घोषित केली आहे. २२ नोव्हेंबर २०१९ रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई उपनगरामध्ये असलेल्या स्टुडिओमध्ये ‘तानाजी’चं चित्रीकरण सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मिलेल्या हिंदवी स्वराज्यातील सिंह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शूरवीर तानाजी मालुसरे यांची कथा या सिनेमाद्वारे जगासमोर येणार आहे. 


अप्रकाशित पैलू समोर

‘आधी लगीन कोंढाण्याचं’, असं म्हणत हिंदवी स्वराज्याच्या रक्षणाला प्रथम प्राधान्य देत पोटच्या मुलाच्या लग्नाला दुय्यम मानणाऱ्या तानाजींच्या जीवनातील काही अप्रकाशित पैलूही या सिनेमाद्वारे समोर येणार आहेत. या सिनेमाची मूळ कथा जरी महाराष्ट्राच्या लाल मातीतील असली तरी हिंदीचा कॅनव्हास फार मोठा असल्याने हिंदी सिनेमाच्या माध्यमातून तानाजी मालुसरेंची कथा जगभर पोहोचण्यास मदत होईल या विचाराने हा सिनेमा मराठीत न बनवता हिंदीत बनवत असल्याची भावना दिग्दर्शक ओम राऊतने ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना व्यक्त केली.


१६० कोटी खर्च

अजय देवगणच्या अजय देवगण फिल्म्स लि. आणि भूषण कुमार यांच्या टी-सिरीजच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती केली जात आहे. १६० कोटी रुपये खर्चून बनवण्यात येणाऱ्या या सिनेमातील इतर कलाकारांची नावं अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली असली तरी बरेच मराठमोळे चेहरे या सिनेमाच्या माध्यमातून हिंदीच्या पडद्यावर झळकणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या सिनेमात काजोल आणि सैफ अली खानही दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.हेही वाचा -

ब्रुस ली इज बॅक!

बाळासाहेब आणि ‘मी शिवाजी पार्क’
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा