ब्रुस ली इज बॅक!

दुबईमध्ये ‘ही इज बॅक’ या सिनेमाचा मुहूर्त मोठ्या दिमाखात संपन्न झाला. शोटाइम सिनेमा व एसबीएम स्टुडियो यांनी निनजूर पिक्चर्सच्या सहकार्याने ‘ही इज बॅक’ची निर्मिती करण्याची घोषणा केली आहे.

SHARE

बसला ना आश्चर्याचा धक्का? जगभरातील असंख्य चाहत्यांचं प्रेम मिळवून अचानक या जगातून एक्झिट घेतलेला अभिनेता ब्रुस लीचे सिनेमे आजही प्रेक्षकांना भुरळ घालतात. आपला आवडता अभिनेता पुन्हा परतावा असं ब्रुस लीच्या सर्वच चाहत्यांना वाटत असताना ‘ही इज बॅक’ या सिनेमाचा मुहूर्त करण्यात आला आहे. या सिनेमाची कथा ब्रुस लीच्या प्रेरणेनं लिहिण्यात आली आहे.

दुबईमध्ये मुहूर्त 

दुबईमध्ये ‘ही इज बॅक’ या सिनेमाचा मुहूर्त मोठ्या दिमाखात संपन्न झाला. शोटाइम सिनेमा व एसबीएम स्टुडियो यांनी निनजूर पिक्चर्सच्या सहकार्याने ‘ही इज बॅक’ची निर्मिती करण्याची घोषणा केली आहे. ‘ही इज बँक’च्या मुहूर्त सोहळ्याला दीप प्रज्वलनाने सुरुवात करण्यात आली. रॉयल एक्सीलेंसी ऑफ थाईलँड मॉम लुआंग राजद्रारासरी जयंकुरा, किरसण इलुमिज़िनोव, रशियन फेडरेशनचे फॉर्मर प्रेसिडेन्ट ऑफ काल्मिकिया व प्रिंस फ़िरूज़ अलेक्झँडर सेफ्रे, मेंबर ऑफ रॉयल इंस्टीट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्स चार्टर्ड आर्किटेक्ट रीबा, इंग्लंड, एडमंड अवाकियन, थॉमस फंग, फतेमाह हुसैन ज़मानी आणि लाज़र जँकोवल्जेविक आदी जागतिक पातळीवरील मान्यवर सोहळ्याला उपस्थित होते.


गरीब मुलाची कथा

ब्रूस ली यांच्या प्रेरणेने लिहिण्यात आलेल्या या चित्रपटाची कथा एका गरीब मुलाभोवती गुंफण्यात आली आहे. हा गरीब मुलगा जगाला कसा बदलतो त्याचं चित्रण या सिनेमात पहायला मिळणार आहे. ब्रुस लीचा भक्त असलेला अभिनेता एल बी या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एल बी हा ब्रुस लीचा अनुयायी असून त्याने आपलं शरीर ब्रूस लीच्या शैलीत बदललं आहे.


एलीना मुख्य भूमिकेत 


या सिनेमात हॉलीवुडच्या मोठमोठ्या कलाकारांसोबत अभिनेत्री एलीना इलुमिजिनो मुख्य भूमिकेत आहे. रॉकलाइन वेंकटेश यांनी मुहूर्ताचा क्लॅप दिला आणि आबू धाबीमधील डॉ. बी. आर. शेट्टी यांनी कॅमेऱ्याचं बटण दाबून शाॅट ओके केला. अमरजीत शेट्टी हे चित्रपटाचे सह-निर्माते असून, विलियम बॉन्ड कार्यकारी निर्माता आहेत.हेही वाचा -

आयुषमान खुरानाच्या पत्नीला कॅन्सर

बाळासाहेब आणि ‘मी शिवाजी पार्क’
संबंधित विषय
ताज्या बातम्या