अभिनेता आयुष्यमान खुराना याची पत्नी ताहिरा कश्यप-खुराना हिला कॅन्सरचं निदान झालं आहे. ताहिरानं यासंदर्भात इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे. यात तिनं झिरो ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती दिली आहे. आपण सध्या उपचार घेत असून आपली प्रकृती ठिक असल्याचंही तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं अाहे.
"कॅन्सर कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे अशी काही लक्षणं दिसू लागली तर स्वत:ची काळजी घ्या. आधी चाचणी करा आणि असं काही असल्यास योग्य उपचार करा. अशा वेळी न घाबरता परिस्थितीचा सामना करा," असा संदेश तिनं पोस्टरद्वारे दिला आहे. याशिवाय मस्करीतच तिनं हे म्हटले आहे की, 'मला आता अँजला जॉलीचं भारतीय वर्जन असल्यासारखं वाटत आहे.’ यावरूनच तिची कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची काय क्षमता आहे हे कळून येतं.
ब्रेस्ट कॅन्सर झिरो स्टेजवर असल्यामुळे त्यावर उपचार करणं सोपं झालं अाहे. नुकतीच तिची सर्जरी झाली. सर्जरी करून डॉक्टरांनी तिची एक ब्रेस्ट काढून टाकली आहे. हॉस्पिटलमधून तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या तिची प्रकृती ठिक आहे.
हेही वाचा -