Advertisement

तापसीच्या ‘गेम ओव्हर’चं रक्तरंजीत पोस्टर

‘गेम ओव्हर’चं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. त्या मागोमाग या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित केला जाणार आहे.

तापसीच्या ‘गेम ओव्हर’चं रक्तरंजीत पोस्टर
SHARES

काॅलिवुडकडून बाॅलिवुडकडे वळल्यापासून बऱ्याचदा स्त्रीप्रधान चित्रपटांमध्ये भूमिका साकारताना दिसणाऱ्या तापसी पन्नूचा ‘बदला’ या चित्रपटामधील अॅटीट्युड सर्वांनाच भावला होता. आता तापसीची भूमिका असलेला ‘गेम ओव्हर’ प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. नुकतंच या आगामी चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.


तमिळ, तेलुगूमध्ये

‘बदला’नंतर तापसीचा कोणता चित्रपट येणार? या तिच्या चाहत्यांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. तापसीची मुख्य भूमिका असलेला ‘गेम ओव्हर’ हा बहुप्रतिक्षीत चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. खरं तर हा चित्रपट मागच्या वर्षीच प्रदर्शित व्हायला हवा होता, पण काही कारणास्तव त्याला विलंब झाला आहे. अश्विन सर्वनन दिग्दर्शित आणि एस. शशिकांत निर्मित हा चित्रपट तमिळ आणि तेलुगू या दोन भाषांमध्ये बनणार असून, हिंदीत डब करण्यात येणार आहे.

टीझरही प्रदर्शित 

‘गेम ओव्हर’चं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. त्या मागोमाग या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित केला जाणार आहे. पोस्टरवर कुंपणासाठी वापरण्यात येणाऱ्या तारेमध्ये जखडलेला एक रक्तरंजीत गोरापान हात पहायला मिळतो. या हातात व्हिडीओ गेमचा रिमोट घट्ट पडकण्यात आला असून, तारांमुळे झालेल्या जखमांमधून रक्त वहात असल्याचं दिसतं. प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक अनुराग कश्यप या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.


टॅगलाईन उत्सुकता वाढवणारी

या चित्रपटात तापसीच्या जोडीला विनोदिनी वैद्यनाथन आणि अनिष कुरुविल्ला यांच्या भूमिका आहेत. रिलायंस एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाच्या पोस्टरवर ‘तुम्ही यापूर्वी असं काहीही पाहिलेलं नसेल’ या आशयाची टॅगलाईन ‘गेम ओव्हर’मधल्या गेमबाबतची उत्सुकता वाढवणारी आहे. दिग्दर्शक अश्विन यांनी काव्या रामकुमार यांच्यासोबत या चित्रपटाचं कथा-पटकथा लेखन केलं असून, संवादलेखन श्रुती मदान यांनी केलं आहे.हेही वाचा -

दिशाची 'बटरफ्लाय कीक' पाहिली का?

दीपिका बनणार रोमी भाटीया!
संबंधित विषय
Advertisement