दिशाची 'बटरफ्लाय कीक' पाहिली का?

दिशा काहीतरी भन्नाट करण्यासाठी स्वत:ला तयार करण्यात व्यग्र आहे. बॅायफ्रेंड टायगर श्रॅाफप्रमाणं दिशाही तासन् तास जिममध्ये घालवत आहे.

  • दिशाची 'बटरफ्लाय कीक' पाहिली का?
SHARE

अभिनेत्री दिशा पाटणीनं सध्या आपल्या करियरवर बारकाईनं लक्ष केंद्रित केलं आहे. जिममध्ये घाम गाळत स्वत:ला स्लीम-ट्रीम ठेवणाऱ्या दिशानं एक क्लीप साशल मीडियावर शेअर केली आहे. यात तिची अफलातून बटरफ्लाय किक पाहायला मिळते.


तासन् तास जिममध्ये

दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या 'भारत' या चित्रपटामधील सलमान खानसोबतच दिशाचं 'स्लो मोशन...' हे आयटम साँग चांगलंच हिट झालं आहे. या गाण्यातील दोघांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. असं असताना दिशा मात्र याहीपेक्षा आणखी काहीतरी भन्नाट करण्यासाठी स्वत:ला तयार करण्यात व्यग्र आहे. बॅायफ्रेंड टायगर श्रॅाफप्रमाणं दिशाही तासन् तास जिममध्ये घालवत आहे. त्यामुळंच तिनं सोशल मीडियावर शेअर केलेली बटरफ्लाय किक पाहिल्यावर आपोआप मुखातून कौतुकपर शब्द निघतात.


व्हिडीओ शेअर

दिशानं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती बटरफ्लाय किक मारताना दिसत आहे. यावरून सध्या ती आपल्या आगामी चित्रपटासाठी स्वत:ची बॅाडी फिट ठेवण्यावर मेहनत घेत असल्याचं जाणवतं. या व्हिडीओसोबत दिशानं बटरफ्लाय किक शिकण्याचा प्रयत्न करत असल्याचंही लिहिलं आहे. या व्हिडीओमध्ये दिशानं व्हाईट टॅाप आणि ब्लॅक पायजमा परिधान केला असून, हवेत सूर मारत बटरफ्लाय म्हणजेच फुलपाखराप्रमाणं उडण्याची स्टेप करत असल्याचं दिसतं.


लिंक - https://twitter.com/DishPataniहेही वाचा  -

दीपिका बनणार रोमी भाटीया!

शाहीद कपूरच्या कबीर सिंग चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
संबंधित विषय
ताज्या बातम्या