शाहीद कपूरच्या कबीर सिंग चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

ओरिजिनल चित्रपट अर्जुन रेड्डी सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात दाक्षिणात्‍य सुपरस्टार विजय देवराकोंडा मुख्‍य भूमिकेत होता. आता हीच भूमिका शाहिद कपूर करत आहे.

SHARE

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा चित्रपट 'कबीर सिंह'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. तेलुगू चित्रपट अर्जुन रेड्डीचा हा हिंदी रिमेक आहे. एका प्रियकराची कहाणी यात दाखवण्यात आली आहे. याआधी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता.


शिव्‍यादारू, ड्रग्सचा भडिमार 

कबीर सिंह ट्रेलरमध्‍ये शाहिद बीयर्ड लुकमध्‍ये दिसत आहेचित्रपटात शिव्‍यादारू आणि ड्रग्स याचा भडिमार आहेचित्रपटात कियारा आडवाणी शाहीदची प्रेमीका दाखवली आहेकबीर सिंह ही एक मेडिकल स्टुडंटची कहाणी आहे.  प्रेमात अयशस्‍वी झाल्‍यानंतर कबीर दारूडा बनतोत्यामुळे त्याचं स्वत:वर आणि स्‍वत:च्‍या रागावर नियंत्रण नसतं.


२१ जूनला रिलीज

शाहिद आणि कियारा पहिल्‍यांदाच चित्रपटात दिसणार आहे. याआधी दोघांची केमिस्‍ट्री म्युझिक व्‍हिडिओ 'उर्वशी'मध्‍ये दिसली होती. संदीप वांगा हे कबीर सिंह दिग्‍दर्शित करत आहेत. हा चित्रपट २१ जून, २०१९ ला रिलीज होणार आहे.

ओरिजिनल चित्रपट अर्जुन रेड्डी सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात दाक्षिणात्‍य सुपरस्टार विजय देवराकोंडा मुख्‍य भूमिकेत होता. आता हीच भूमिका शाहिद कपूर करत आहे. कियाराची यामध्‍ये मुख्‍य भूमिका असून याआधी तिची भूमिका 'स्टुडंट ऑफ द ईयर २' अभिनेत्री तारा सुतारिया करणार होती. नंतर तिनं हा चित्रपटा सोडला आणि करण जोहर प्रोडक्शन हाउस धर्मा प्रोडेक्शनच्‍या SOTY २ निवडला.हेही वाचा -

'चेहरे' चित्रपटातील अमिताभ यांचा फर्स्ट लूक पाहिलात का?

बॉलिवूडमधल्या 'या' अभिनेत्यामुळे किराया आडवाणीचं नाव बदललं
संबंधित विषय
ताज्या बातम्या