अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांच्या मिस्ट्री-थ्रिलर 'चेहरे' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी इमरान हाश्मी यानं ट्विटरवर फोटो शेअर करत शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती दिली. आता चित्रपटातील अमिताभ यांचा फर्स्ट लुक समोर आला आहे.
Amitabh Bachchan's look from mystery thriller #Chehre... Costars Emraan Hashmi... Directed by Rumi Jafry... Produced by Anand Pandit Motion Pictures and Saraswati Entertainment P Ltd... 21 Feb 2020 release. pic.twitter.com/xSwmBVbHlF
— taran adarsh (@taran_adarsh) May 12, 2019
चित्रपट समीक्षक तरूण आदर्श यांनी लुक शेअर करत लिहिलं आहे की, 'अमिताभ यांचा मिस्ट्री-थ्रिलर 'चेहरे'मधील लुक. यामध्ये इमरान हाश्मी सहकलाकार आहे. दिग्दर्शक रूमी जाफरी...चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि सरस्वती एन्टरटेन्मेंट केली आहे.'
फोटोमध्ये अमिताभ विंटेज लुकमध्ये दिसून येत आहेत. त्यांनी कोट आणि ऊनी टोपी परिधान केली आहे. दुसऱ्या फोटोत ते एका सोफ्यावर बसलेले आहेत. त्यांच्यासोबत सहकलाकार दिसत आहेत. अमिताभ आणि इमरान पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. पुढच्या वर्षी २० फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा -