'वेटरन'चा रिमेक हिराेइनशिवाय?

सलमानच्या सिनेमात नेहमीच नवनव्या हिरोइन्स दिसून येतात. परंतु हा सिनेमा त्याला अपवाद असेल. त्यामुळे खऱ्या अर्थानं हा सिनेमा सलमान खानचा होईल.

SHARE

सलमान खाननं २०१५ मधील हिट कोरियन सिनेमा 'वेटरन'चे राइट्स विकत घेतले होते. या सिनेमाचा लवकरच हिंदी रिमेक बनवण्यात येणार आहे. २०२० पर्यंत या सिनेमाचं शूटिंग सुरू होईल. सलमानच्या सिनेमात नेहमीच नवनव्या हिरोइन्स दिसून येतात. परंतु हा सिनेमा त्याला अपवाद असेल. त्यामुळे खऱ्या अर्थानं हा सिनेमा सलमान खानचा होईल

सिनेमाची कथा नायक आणि खलनायकावर बेतल्याने यांत सलमान हिराॅइनसोबत रोमान्स करताना दिसणार नाही. संपूर्ण सिनेमात हिरो आणि खलनायकाची हाणामारीच दिसेल. सिनेमात हिरो आणि खलनायक तोडीस तोड असल्याने निर्मात्यांनी यात एकही रोमँटीक दृश्य न टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सिनेमात खलनायकाच्या भूमिकेसाठी योग्य कलाकाराचा शोध सुरू आहे. खलनायकाच्या भूमिकेसाठी कुठल्या कलाकाराची वर्णी लागते याचीच उत्सुक्ता आहे.हेही वाचा

आता ‘मुन्नी’ नाही, तर ‘मुन्ना’ होणार ‘बदनाम’?

सलमान बनणार ‘कुंवारा बाप’?


संबंधित विषय
ताज्या बातम्या