Advertisement

सलमान बनणार ‘कुंवारा बाप’?

सलमानला मुलं किती आवडतात आणि त्यासोबतच तो मुलांसाठी किती हळवा आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. आज सलमानचं वय ५३ असल्यानं आणि वारंवार लग्नासाठी दबाव येत असल्यानंच कदाचित त्यानं सरोगसीचा पर्याय निवडला असावा, असं बोललं जात आहे.

सलमान बनणार ‘कुंवारा बाप’?
SHARES

मागील काही वर्षांपासून तमाम चाहत्यांसोबतच बाॅलिवुडही अभिनेता सलमान खानच्या लग्नाच्या बातमीच्या प्रतीक्षेत असताना सलमान मात्र काहीसा वेगळाच विचार करत आहे. लग्न न करताच सरोगसीद्वारे ‘कुंवारा बाप’ होण्याची सलमानची मनीषा असल्याचं समजतं.


सलमानच्या लग्नाची पार्श्वभूमी

नुकतंच सलमानच्या लग्नाचं ‘एथे आ…’ हे ‘भारत’ चित्रपटातील गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला सलमानच्या लग्नाची पार्श्वभूमी आहे. आता प्रेक्षकांना या गाण्यातच सलमानचं लग्न पाहण्याची हौस भागवावी लागणार असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण सलमान सरोगसीच्या माध्यमातून पिता बनायच्या विचारात असल्यानं भविष्यात त्याचं लग्न होईल या चर्चेला जवळजवळ पूर्णविराम लागला आहे. त्यामुळं आजवरच्या आपल्या कारकिर्दीत कधी आघाडीच्या, तर कधी स्ट्रागलिंग अक्ट्रेससोबत अफेअरची चर्चा असलेला सलमान लग्न न करताचा पिता होणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत.


सरोगसीद्वारे पिता बनणार

एका मीडिया हाऊसनं दिलेल्या बातमीनुसार सलमान सरोगसीद्वारे पिता बनण्याच्या विचारात असल्याचं समजतं. सलमानला मुलं किती आवडतात आणि त्यासोबतच तो मुलांसाठी किती हळवा आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. आज सलमानचं वय ५३ असल्यानं आणि वारंवार लग्नासाठी दबाव येत असल्यानंच कदाचित त्यानं सरोगसीचा पर्याय निवडला असावा, असं बोललं जात आहे. तसं पाहिलं तर बालिवुडमध्ये सरोगसीद्वारे आई-वडील बनणाऱ्या सेलिब्रिटीजची संख्या कमी नाही.


 ५ जूनला प्रदर्शित 

यापूर्वी शाहरुख खान, करण जोहर, एकता कपूर, सनी लिओनी या सेलिब्रिटीजनी सरोगसीद्वारे आई-वडील बनण्याचा पर्याय निवडला आहे. यांच्याच पावलावर पाऊल ठेवत सलमानही सरोगसीच्या माध्यमातून वडील विचार करत असल्यानं त्याच्या चाहत्यांसाठी ही जणू खुशखबरच आहे. सलमान सध्या ‘भारत’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ५ जूनला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडून सर्वांनाच खूप अपेक्षा आहेत. अशातच सलमान ‘कुंवारा बाप’ बनणार असल्याची आलेली बातमी ‘भारत’साठी फायदेशीर ठरणारी असल्याचं मानलं जात आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या या चित्रपटात पुन्हा एकदा सलमानसोबत कतरीना कैफ आहे.हेही वाचा- 

... म्हणून हृतिकनं 'सुपर ३०' चित्रपटाची प्रदर्शन डेट पुढे ढकलली

सैफ अली खानची छोट्या पडद्यावर एन्ट्री
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा