Advertisement

... म्हणून हृतिकनं 'सुपर ३०' चित्रपटाची प्रदर्शन डेट पुढे ढकलली

हृतिक रोशन याचा 'सुपर 30' आणि अभिनेत्री कंगना रनौत हिचा 'मेंटल है क्या' हे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार होते. त्यामुळे हृतिकनं हा निर्णय घेतला आहे.

... म्हणून हृतिकनं 'सुपर ३०' चित्रपटाची प्रदर्शन डेट पुढे ढकलली
SHARES

अभिनेता हृतिक रोशन याचा 'सुपर 30' आणि अभिनेत्री कंगना रनौत हिचा 'मेंटल है क्या' हे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार होते. यावरून कंगना आणि हृतिकमधील वाद पुन्हा एकदा उफाळून आला होता. कंगनाची बहिण रंगोलीनं हृतिकवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला होता. त्यामुळे आता हृतिकनं या वादातून माघार घेत त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती निर्मात्यांना केली आहे.


मीडियातील सर्कशीपासून माझ्या कामाचा अपमान होऊ नये म्हणून मी माझ्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती निर्मात्यांना केली आहे. यामुळे मी स्वत:चा मानसिक हिंसाचार आणि त्रासापासून बचाव केला आहे. माझा चित्रपट पूर्णपणे तयार आहे. तरीही मी निर्मात्यांना लवकरात लवकर नवीन तारीख जाहीर करण्याची विनंती केली आहे’, असं ट्विट त्यानं केलं आहे.



हेही वाचा -

चुपके-चुपकेच्या रिमेकमध्ये धर्मेद्रची भूमिका साकारणार 'हा' कलाकार




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा