Advertisement

चुपके-चुपकेच्या रिमेकमध्ये धर्मेद्रची भूमिका साकारणार 'हा' कलाकार

टी सीरिजचे भूषण कुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील एका क्लासिक चित्रपटाचा रिमेक करण्यासाठी दिग्दर्शक लव रंजन यांच्याशी हातमिळवणी केली आहे. १९७५ चा सुपरहिट कॉमेडी चित्रपट ‘चुपके चुपके’ चा रिमेक बनवण्याच्या तयारीत ते आहेत.

चुपके-चुपकेच्या रिमेकमध्ये धर्मेद्रची भूमिका साकारणार 'हा' कलाकार
SHARES

बॉलीवूडमध्ये सध्या जुन्या गाण्यांचे आणि चित्रपटांचे रिमेक बनवण्याचा ट्रेंड सुरू आहे. आता टी सीरिजचे भूषण कुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील एका क्लासिक चित्रपटाचा रिमेक करण्यासाठी दिग्दर्शक लव रंजन यांच्याशी हातमिळवणी केली आहे. १९७५ चा सुपरहिट कॉमेडी चित्रपट ‘चुपके चुपके’ चा रिमेक बनवण्याच्या तयारीत ते आहेत.


इतर कलाकारांचा शोध

१९७५ साली बनवण्यात आलेल्या या चित्रपटात धर्मेंद्र, अमिताभ, जया बच्चन, शर्मिला टागोर यांसारखे कलाकार होते. ओम प्रकाश यांच्या या चित्रपटात धर्मेंद्र यांनी प्रोफेसर परिमल त्रिपाठीची भूमिका केली होती. विनोदाचं अजब रसायन या चित्रपटानं घडवून आणलं होतं. आता ती भूमिका राजकुमार राव साकारणार आहे. चित्रपटातील अन्य कलाकारांची नावं अजून फायनल झाली नाही. पण बाकी भूमिकांसाठी कलाकारांचा शोध सुरू आहे.  हेही वाचा -

जाहिरातबाजीतही रणवीर-दीपिका अव्वल

आता ‘मुन्नी’ नाही, तर ‘मुन्ना’ होणार ‘बदनाम’?
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा