बॉलिवूडमधल्या 'या' अभिनेत्यामुळे किराया आडवाणीचं नाव बदललं

कियारा आडवाणी या नावाला इंडस्ट्रीमध्ये वेगळी ओळख आहे. पण हे तिचं खरं नाव नसून तीनं तिचं नाव बदललं तेही सलमान खानच्या सांगण्यावरून.

SHARE

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणीनं कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये चांगलं यश कमावलं आहे. कियारा आडवाणी या नावाला इंडस्ट्रीमध्ये वेगळी ओळख आहे. पण हे तिचं खरं नाव नसून तिनं तिचं नाव बदललं तेही सलमान खानच्या सांगण्यावरून.


आधी आलिया आडवाणी 

कियारा आडवाणीचं नाव आधी आलिया आडवाणी होतं. सलमान खानच्‍या सल्‍ल्‍यानंतर तिनं आपलं नाव बदललं. कियारानं २०१४ मध्‍ये 'फगली'मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. कियाराचे नाव आधी आलिया असं होतं. ही माहिती तिने एका रिॲलिटी शोमध्‍ये सांगितली.


निवड स्वतःची

शोमध्‍ये कियारानं सांगितलं की, 'पहिल्‍यांदा माझे नाव आलिया होतं. सलमान खाननं आलिया भट्टच्‍या नावामुळे माझं नाव बदलण्‍याचा सल्‍ला दिला होता. कारण, बॉलिवूडमध्‍ये एकाच नावाच्‍या दोन अभिनेत्री असू शकत नाही, असं सलमानचं म्‍हणणं होतं. सलमाननं केवळ सल्‍ला दिला होता. परंतु, मी माझ्‍या नावाची निवड (कियारा) स्‍वत: केली होती. आता तर मला माझ्‍या घरातील सर्वजण कियारा नावानं हाक मारतात.


अक्षयसोबत स्पेशल अपीयरन्‍स 

कियाराचा डेब्यू चित्रपट फगलीच्‍या एका गाण्‍यात सलमाननं अक्षयसोबत एक स्पेशल अपीयरन्‍स दिला होता. या चित्रपटामध्‍ये जिमी शेरगिल, मोहित माहवाह, विजेंदर सिंह आणि आर्फी लांबानेदेखील महत्वपूर्ण भूमिका साकारल्‍या होत्‍या. कियाराने 'एम.एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी' आणि 'मशीन' चित्रपटातही काम केलं आहे.हेही वाचा -

चुपके-चुपकेच्या रिमेकमध्ये धर्मेद्रची भूमिका साकारणार 'हा' कलाकार
संबंधित विषय
ताज्या बातम्या