पहा, सलमानच्या रंगीन जीवनाचा फ्लॅशबॅक!

दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर देशात बेरोजगारीची समस्या निर्माण होते. त्याच दरम्यान सलमान तेल खाणीत काम करायला सुरुवात करतो. इथेच कतरीनाशी त्याची ओळख होते. अचानक खाणीत अपघात होतो. त्यातूनही भारत बचावतो. सलमान-कतरिनाचं लग्नही होतं.

  • पहा, सलमानच्या रंगीन जीवनाचा फ्लॅशबॅक!
  • पहा, सलमानच्या रंगीन जीवनाचा फ्लॅशबॅक!
SHARE

अभिनेता सलमान खान मागील बऱ्याच दिवसांपासून 'भारत' या आगामी हिंदी चित्रपटातील आपले नवनवीन लुक सोशल मीडियावर रिव्हील करत आहे. या चित्रपटातील आपल्या रंगीन जीवनाचा फ्लॅशबॅक सांगत सलमाननं 'भारत'चा ट्रेलरही लाँच केला आहे.


सलमानची कहाणी

मुंबईत पार पडलेल्या एका सोहळ्यात प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत 'भारत'चा ट्रेलर लाँच करण्यात आला. या ट्रेलरमध्ये सलमान आपली कहाणी सांगत आहे. ट्रेलरची सुरुवातच ७० वर्षांच्या सलमानपासून होते. '७१ वर्षांपूर्वी हा देश बनला आणि तेव्हाच सुरू झाली माझी कहाणी. लोकांना वाटतं की, एक मिडलक्लास म्हाताऱ्याची लाईफ किती बोअरींग होती असेल. आता त्यांना काय सांगायचं की, जेवढे पांढरे केस माझं डोकं आणि दाढीवर आहेत त्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त माझं जीवन रंगीन होतं', असं म्हणत सलमानच्या 'भारत'चा ट्रेलर सुरू होतो.


मनोरंजनाचा भरपूर मसाला

त्यानंतर सर्कसमधील मौत का कुआमध्ये बाईक चालवणारा सलमान दिसतो. दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर देशात बेरोजगारीची समस्या निर्माण होते. त्याच दरम्यान सलमान तेल खाणीत काम करायला सुरुवात करतो. इथेच कतरीनाशी त्याची ओळख होते. अचानक खाणीत अपघात होतो. त्यातूनही भारत बचावतो. सलमान-कतरिनाचं लग्नही होतं. नेव्हीच्या युनिफॅार्ममध्ये सलमान युद्धसदृश परिस्थितही दिसतो. यावरून या चित्रपटात मनोरंजनाचा भरपूर मसाला असल्याचं जाणवतं.


५ जूनला प्रदर्शित

या ट्रेलरमध्ये सलमान-कतरीनासोबतच 'भारत'चा मित्र बनलेला सुनील ग्रोव्हरची चमकतो. या कलाकारांखोरीज या चित्रपटात जॅकी श्रॅाफ, तब्बू, दिशा पाटनी आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. अली अब्बास झफर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट ५ जून म्हणजे यंदा ईदला प्रदर्शित होणार आहे. अली अब्बास झफर यांनी यापूर्वी सलमानसोबत 'सुलतान' आणि 'टायगर झिंदा है' हे चित्रपट बनवले आहेत.

लिंक://www.facebook.com/BeingSalmanKhan/videos/754087604987529/?t=2हेही वाचा -

रणबीर बनला सुपरपॅावर असलेला डीजे!

या चित्रपटासाठी राजकुमार बनणार धर्मेंद्र
संबंधित विषय
ताज्या बातम्या