Advertisement

या चित्रपटासाठी राजकुमार बनणार धर्मेंद्र

१९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या बहुचर्चित 'चुपके चुपके' या चित्रपटाचाही समावेश आहे. या चित्रपटाचा आता रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात धर्मेंद्र यांची भूमिका राजकुमार राव साकारणार असल्याचं नक्की झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

या चित्रपटासाठी राजकुमार बनणार धर्मेंद्र
SHARES

आजच्या नव्या जमान्यात जुन्या चित्रपटांचा रिमेक बनवण्याचा ट्रेंड जोरात सुरू आहे. जुन्या गाजलेल्या चित्रपटांच्या कथा आजच्या काळातील कलाकारांच्या साथीनं काळानुरूप बदल घडवत सादर केल्या जात आहेत. या ट्रेंडमध्ये आता ७० च्या दशकात गाजलेल्या एका चित्रपटाचाही समावेश झाला आहे. याच चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची भूमिका साकारण्याचं आव्हान अभिनेता राजकुमार रावसमोर आहे.


'चुपके चुपके'चा रिमेक

अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी एके काळी बरेच चित्रपट गाजवले आहेत. यात १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या बहुचर्चित 'चुपके चुपके' या चित्रपटाचाही समावेश आहे. या चित्रपटाचा आता रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात धर्मेंद्र यांची भूमिका राजकुमार राव साकारणार असल्याचं नक्की झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. निर्माते भूषण कुमार आणि लव रंजन यांनी 'चुपके चुपके'चा रिमेक बनवण्याचं निश्चित केलं आहे. 


प्यारेलालची भूमिका

ऋषिकेश मुखर्जी यांच्या सदाबहार कॅामेडी चित्रपटासाठी आजच्या काळातील कोणकोणते कलाकार घ्यायचे याची निवडप्रक्रिया सध्या सुरू आहे. ओरिजनल 'चुपके चुपके'मध्ये धर्मेंद्र यांनी साकारलेले प्रोफेसर परीमल त्रिपाठी उर्फ प्यारेलालची भूमिका राजकुमार साकारणार आहे. या चित्रपटात अमिताभ यांनी धर्मेंद्र म्हणजेच प्यारेलाल असल्याचं नाटक केलं होतं, पण ते मूळात प्रोफेसर सुकुमार सिन्हांच्या भूमिकेत असतात, जे इंग्रजीचे प्राध्यापक असतात. शर्मिला टागोर यांनी धर्मेंद्रच्या पत्नीची भूमिका साकारली होती, तर ओम प्रकाश बॅरीस्टर जीजाजी बनले होते. 


राजकुमारची निवड

सध्या तरी या चित्रपटातील धर्मेंद्रच्या भूमिकेसाठी राजकुमारची निवड झाल्याचं समजलं आहे. इतर कलाकारांची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. यात राजकुमारची जोडी कोणासोबत बनते ते पाहायचं आहे. ओरिजनल चित्रपटात अमिताभसोबत जया बच्चन होत्या. त्यामुळं रिमेकमध्ये अमिताभ-जया यांची जागा कोणते कलाकार घेतात हे पाहणंही उत्सुकतेचं ठरणार आहे.



हेही वाचा -

रुपेरी पडद्यावर माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर

ऋतिक पुन्हा करतोय बाॅडी ट्रान्सफॉर्मेशन! व्हिडीओ पहा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा