ऋतिक पुन्हा करतोय बाॅडी ट्रान्सफॉर्मेशन! व्हिडीओ पहा

ऋतिक आपल्या फिटनेसबाबत कायम जागरूक असतो. फिट राहण्यासाठी तो नियमित जीममध्ये जातो. नुकताच ऋतिकनं एक व्हिडीओ बनवला आहे, ज्यात तो प्रचंड ताकदीनं व्यायाम करत असल्याचं पहायला मिळतं.

SHARE

काही कलाकार कितीही अडचणी आल्या तरी थांबत नाहीत. एक काम संपलं की पुढल्या कामाला सुरुवात करतात. अभिनेता ऋतिक रोशनही अशांपैकीच एक आहे, जो दुखापतग्रस्त असूनही सध्या जीमममध्ये मेहनत घेत असल्याचं या व्हिडीओत पहायला मिळतं.प्रचंड ताकदीनं व्यायाम 

ऋतिक आपल्या फिटनेसबाबत कायम जागरूक असतो. फिट राहण्यासाठी तो नियमित जीममध्ये जातो. नुकताच ऋतिकनं एक व्हिडीओ बनवला आहे, ज्यात तो प्रचंड ताकदीनं व्यायाम करत असल्याचं पहायला मिळतं. या व्हिडीओमध्ये ऋतिक मोमेंटम रॅप्स करताना दिसतो. हा व्यायाम शरीरातील सर्व जंक काढून शरीर मजबूत बनवतो.


झीरो मोमेंटम रॅप्स

या व्हिडीओसोबत ऋतिकनं लिहिलं आहे की, ‘ट्रान्सफॉर्मेशन जर्नीचा दूसरा दिवस. मागील बऱ्याच दुखापतींमुळं झीरो मोमेंटम रॅप्स सुरू सुरू केला आहे, जो मला आतून मजबूत बनवेल. हा व्यायाम आता माझ्या वर्कआऊट अॅप्सचा भाग बनल्याचंही ऋतिकचं म्हणणं आहे. याचा अर्थ ऋतिक पुन्हा एकदा बाॅडी ट्रान्सफॉर्मेशन करत आहे असाच होतो. 


सुपर ३०

ऋतिकनं नेहमीच आपल्या व्यक्तिरेखांवर कसून मेहनत घेतली आहे. यासाठी बऱ्याचदा त्याला दुखापतींचा सामनाही करावा लागला आहे. तरीही तो कायम हार मानत नाही. ऋतिक सध्या ‘सुपर ३०’ या चित्रपटामुळं चर्चेत आहे. २६ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात त्यानं एक अनोखी व्यक्तिरेखा साकारली आहे. आता तो पुढच्या तयारीला लागला असून, त्यासाठीच तो जीममध्ये मेहनत घेत असावा. कदाचित ऋतिकनं दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्या आगामी अनटायटल चित्रपटाची तयारी सुरू केली असावी.हेही वाचा -

सलमाननं उलगडलं जीवनाचं रहस्य

कंगना-राजकुमारचे वेडे चाळे पाहिले का?
संबंधित विषय
ताज्या बातम्या