सलमाननं उलगडलं जीवनाचं रहस्य

'हर मुस्कुराते चेहरे के पीछे दर्द छुपा होता है और वही दर्द आपको जिंदा रखता है', असं ट्वीट करत सलमाननं 'भारत'चं पाचवं पोस्टर आपल्या चाहत्यांसमोर आणलं आहे. या पोस्टरमध्ये सलमान पुन्हा कतरीना कैफसोबत आहे. कतरीनासोबतचं सलमानचं हे तिसरं आणि 'भारत' चित्रपटाचं हे पाचवं पोस्टर आहे.

SHARE

अभिनेता सलमान खान दररोज आपल्या 'भारत' या आगामी हिंदी चित्रपटाचं नवं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करीत आहे. ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच ५ जूनला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातील पाचवं पोस्टर रिलीज करताना सलमाननं जीवनाचं सार सांगितलं आहे.


पाचवं पोस्टर

'हर मुस्कुराते चेहरे के पीछे दर्द छुपा होता है और वही दर्द आपको जिंदा रखता है', असं ट्वीट करत सलमाननं 'भारत'चं पाचवं पोस्टर आपल्या चाहत्यांसमोर आणलं आहे. या पोस्टरमध्ये सलमान पुन्हा कतरीना कैफसोबत आहे. कतरीनासोबतचं सलमानचं हे तिसरं आणि 'भारत' चित्रपटाचं हे पाचवं पोस्टर आहे. या पोस्टरमध्ये फ्रंटला सलमान, तर पाठीमागे कतरीना आहे. दोघांचाही अगदी साधा लुक या पोस्टरवर पाहायला मिळतो. थोड्या वाढलेल्या दाढीतील सलमान या पोस्टरमध्ये आहे. 


कतरीना साडीत 

पहिल्या पोस्टरमध्ये कतरीनाच्या कपाळावर टिकली नव्हती, पण नंतरच्या दोन पोस्टरमध्ये टिकली आहे. या पोस्टरमध्ये मध्यम वयातील सलमान असून, त्यानं शर्ट-ब्लेझर घातलं आहे. या पोस्टरमध्ये कतरीना साडीत आहे. हे पोस्टर या चित्रपटातील १९९० चा काळ दर्शवणारं आहे. सलमाननं जे पहिलं पोस्टर शेअर केलं होतं त्यात त्याचा चित्रपटातील लेटेस्ट म्हणजेच २०१० मधील लुक रिव्हील करण्यात आला होता. त्यानंतर तरुणपणीचा सलमान पोस्टरमध्ये हळूहळू मध्यम वयापर्यंतच्या लुकपर्यंत पोहोचला आहे.


कोरियन चित्रपटाचा रिमेक

'भारत' हा चित्रपट म्हणजे 'ओडे टू माय फादर' या कोरियन चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलं आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं सलमान-कतरीना ही जोडी सहाव्यांदा एकत्र आली आहे. खरं तर या चित्रपटासाठी प्रियांका चोप्रा पहिली पसंत होती, पण काही कारणास्तव तिला जमलं नाही आणि कतरीनाची एंट्री झाली. या चित्रपटात जॅकी श्राॅफ आणि दिशा पाटणी यांच्याही भूमिका आहेत. हेही वाचा -

कंगना-राजकुमारचे वेडे चाळे पाहिले का?

सलमाननं ठोकला ‘भारत’च्या लुकचा ‘चौकार’
संबंधित विषय
ताज्या बातम्या